AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK | ‘मला आधीच माहित होतं की…’; पावसामुळे मॅच जिंकल्यावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत

NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामन्यामध्ये पावसाने बॅटींग करत पाकिस्तान संघाला जिंकून दिलं. किवींचं नशीबच फुटकं म्हणावे लागेल कारण 401 धावा करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर बाबरने पावसाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

NZ vs PAK | 'मला आधीच माहित होतं की...'; पावसामुळे मॅच जिंकल्यावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Nov 04, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023मधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामधील सामन्यात पावसामुळे किंवींचा धावांनी पराभव झाला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 401 धावा केल्या होत्या. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने दमदार सुरूवात केलेली. पाऊस आला आणि सगळी गणित बदलून गेला, डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाकिस्तान संघ धावगतीने पुढे असल्याने त्यांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपली प्रतिक्रिया देताना लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरण्याआधी काय प्लॅन केला याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाला बाबर?

जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये होतो त्यावेळी मी सांगितलं की एक मोठी भागीदारी व्हायला हवी. फखर जमानला फक्त 15 ओव्हर जरी त्याच्या पद्धतीने खेळल्या तरी आपण सामन्यात आघाडीवर असू असं म्हटलं होतं. बाऊंड्री लहान असल्याचा आम्ही फायदा घेतला. आतल्या आत पाऊस पडणार हे समजलं असल्याचं बाबर आझमने सांगितलं.

न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने आपला पहिला गडी लवकर गमावला होता.  अब्दुल्ला शफीक दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला. बाबर मैदानात आला त्यानंतर फखर जमाना याने डावाचू सूत्रे आपल्या हातात घेतली. फखरने  63 बॉलच्या मदतीने आणि 158.73 च्या स्ट्राईक रेटने आपलं शतक पूर्ण करत विक्रम रचला, त्याला माहित होतं  की लक्ष्य आणखी दूरू आहे. 81 चेंडूत 124 धावांवर तो नाबाद राहिला. या खेळीमध्ये 8 चौकार आणि 11 षटकार मारले. त्यासोबतच बाबर आझमनेही नाबाद 66 धावांची खेळी केली.

पाकिस्तान प्लेईंग 11 | बाबर आझम (C), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

न्यूझीलंड प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (W), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.