World Cup 2023 | Pakistan टीमला मोठा झटका, स्टार बॉलर वर्ल्ड कपआधी ‘आऊट’!

Pakistan Cricket Team World Cup 2023 | पाकिस्तानचं आशिया कप 2023 कप जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. त्यानंतर आता वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

World Cup 2023 | Pakistan टीमला मोठा झटका, स्टार बॉलर वर्ल्ड कपआधी 'आऊट'!
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 6:28 PM

मुंबई | पाकिस्तान क्रिकेट टीमचं आशिया कप 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं. करो या मरो सामन्यात 14 सप्टेंबर रोजी श्रीलंकेने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर पाकिस्तानचा प्रवास इथेच संपला. पाकिस्तान आता आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहेत. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 7 संघांनी टीम जाहीर केली आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकाने अजून वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा केलेली नाही. त्याआधी पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे.

पाकिस्तानचा स्टार बॉलर नसीम शाह हा दुखापतीमुळे आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम मॅनेजमेंट चिंतेत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला मोजून काही दिवस शिल्लक असताना मोठा मॅचविनर बॉलर हा दुखापतीच्या कचाट्यात फसल्याने पाकिस्तानची चिंता वाढलीय. नसीम शाह दुखापतीनंतर वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत शंका आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नसीम शाह हा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं गेलंय.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानला मोठा झटका

नसीम शाह याला नक्की काय झालं?

नसीम शाब याच्या उजव्या खांद्याला दुखापत झालीय. नसीमला आशिया कप सुपर 4 सामन्यात फिल्डिंग दरम्यान ही दुखापत झाली. नसीमने फिल्डिंग करताना चौकार रोखण्यासाठी बाउंड्री लाईनवर जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नात नसीम दुखापतीचा शिकार झाला. त्यामुळे नसीमला टीम इंडिया विरुद्ध पूर्ण 10 ओव्हरही टाकता आल्या नाहीत. इतकंच नाही, तर नसीम या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला. त्यामुळे नसीमच्या जागी श्रीलंका विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात जमान खान याला संधी देण्यात आली होती.

दरम्यान नसीमच नाही, हरीस रौफ याला देखील दुखापत झाली आहे. हरीसलाही दुखापतीमुळे श्रीलंका विरुद्ध खेळता आलं नाही. वर्ल्ड कपसाठी 27 सप्टेंबरपर्यंत टीमची घोषणा करण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे हे दोघे आघाडीचे बॉलर पूर्णपणे फिट होऊन वर्ल्ड कपसाठी टीममध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे क्रिकेट विश्वाचं आता लक्ष असणार आहे.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.