ind vs wi : Sarfaraz Khan साठी पाकिस्तानातून आवाज, Rohit Sharma वर निर्माण केलं प्रश्नचिन्ह

ind vs wi : आगामी वेस्ट इंडिज टूरसाठी कसोटी संघात मुंबईच्या सर्फराज खानची निवड झालेली नाही. त्यासाठी आता पाकिस्तानातून आवाज उठू लागले आहेत. एक पाकिस्तानी क्रिकेटपटू सर्फराज खानच्या समर्थनासाठी पुढे आलाय.

ind vs wi : Sarfaraz Khan साठी पाकिस्तानातून आवाज, Rohit Sharma वर निर्माण केलं प्रश्नचिन्ह
question over non selection of mumbai batter sarfaraz khanImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 1:46 PM

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. संघ निवड जाहीर झाल्यानंतर काही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण काही निराश आहेत. निराश होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्फराज खानच नाव सर्वात वरती आहे. मागच्या तीन वर्षापासून सर्फराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करतोय. मात्र, तरीही त्याला टेस्ट स्क्वाडमध्ये जागा मिळालेली नाही. सुनील गावस्करांसारख्या दिग्गज क्रिकेटपटुनीही यावर प्रश्न उपस्थित केला.

आता पाकिस्तानातूनही सर्फराजच्या समर्थनाचे आवाज येऊ लागले आहेत. पाकिस्तानातून एक क्रिकेटपटूने सर्फराज खानच समर्थन करताना सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.

उमरान मलिकवरही कमेंट

सर्फराज खानसाठी आवाज उठवणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूच नाव आहे, कामरान अकमल. त्याने आपल्या युट्यूब चॅनलवर सर्फराज खानसह उमरान मलिक आणि रोहित शर्माच्या कॅप्टनशिपवर कमेंट केली आहे. रोहितने तर, विराट कोहलीकडून शिकण्याची गरज आहे, असं कामरान अकलम म्हणाला. कामरान अकमल नेमकं काय बोललाय? ते जाणून घेऊया.

काय म्हणाला हा पाकिस्तानी क्रिकेटर?

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या सिलेक्शननंतर कामरान अकमल हे म्हणालाय. “भारतात टीम निवड झाल्यानंतर एक-दोन खेळाडूंबद्दल चर्चा होते. यात सर्फराज खान एक प्लेयर आहे. त्याने दमदार प्रदर्शन केलं. पण त्याला संधी मिळाली नाही. सर्फराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही, हे आपल्याला माहित आहे. पण त्याची टीममध्ये निवड करायला पाहिजे होती. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सर्फराजची निवड करणं, ही परफेक्ट संधी होती” असं कामरान अकमलने म्हटलय. रोहित शर्माला टोमणे

कामरान अकमलने रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्न उपस्थित केले. “वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाने मजबूत संघ निवडलाय. रोहित शर्मा तिथे चांगली कॅप्टनशिप करेल, अशी मला अपेक्षा आहे. रोहितने ग्राऊंडवर त्याची उपस्थिती दाखवून दिली पाहिजे. त्याच्याकडे संधी आहे. रोहित शर्माने कॅप्टन म्हणून मैदानावर विराट कोहलीसारख Active असलं पाहिजे” असं कामरान अकमल म्हणाला. वेस्ट इंडिज टूरवर उमरान मलिक हिट होईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली. अकमलच्या मते, तिथे उमरानला रिव्हर्स स्विंग मिळेल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.