PAK vs AUS: पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सिरीजवर दहशतवादाचं सावट, सामन्याच्या पहिल्याच दिवशी पेशावरमध्ये स्फोट
पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर (Peshawar blast) येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयात 30 मृतदेह (Deaths In bomb blast) आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पेशावर : पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर (Peshawar blast) येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयात 30 मृतदेह (Deaths In bomb blast) आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना कोचा रिसालदार परिसरात घडली आहे. पेशावरचे सीसीपीओ इजाज अहसान यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे. हे मात्र अद्याप समजू शकले नाही. दुसऱ्या बाजूला तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला आहे. उभय संघांमधील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज पहिला दिवस होता. ज्या ठिकाणी आज स्फोट झाला तिथून 190 किलोमीटर अंतरावर असलेल्या रावळपिंडी येथे उभय संघांमधील कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, पेशावरमधील स्फोटाने पाकिस्तान ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर दहशतवादाचं सावट असल्याचे बोलले जात आहे.
तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच कसोटी सामना खेळण्यासाठी पाकिस्तानच्या मैदानावर उतरला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीतील प्रसिद्ध पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला, परंतु काही तासांतच पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले आहे. रावळपिंडीपासून सुमारे 190 किमी अंतरावर असलेल्या पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे 50 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानमध्ये राहण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा
एखाद्या मोठ्या परदेशी क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करावा, अशी पीसीबीसह, पाकिस्तानी क्रिकेटपटू, चाहत्यांची इच्छा होती. कारण इंग्लंड, (England) ऑस्ट्रेलियासारखे (Australia) संघ पाकिस्तान दौऱ्यावर आले, तर क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांच्या मनात पाकिस्तानबद्दल एक विश्वासाची भावना निर्माण होईल. पाकिस्तान आता धोकादायक देश राहिलेला नाही, हा संदेश जाईल. त्यासाठी पीसीबीसह तमाम पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी ऑस्ट्रेलियन संघाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानचा दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ सहा आठवडे पाकिस्तानात वास्तव्य करणार आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या संघावर झाला होता गोळीबार
2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. श्रीलंकन क्रिकेटपटूंच्या बसवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर क्रिकेट जगतातील प्रमुख संघांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक आश्वासने दिली. पण कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात आला आहे. पाचवर्षांपूर्वी लाहोर चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. पाकिस्तानात सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे ऑस्ट्रेलियन संघाने इतकी वर्ष पाकिस्तानचा दौरा केला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात शेवटचा 1998 साली खेळला होता. त्यावेळी त्यांनी तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती.
अचानक दोन देशांनी रद्द केला दौरा
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने टीम पाकिस्तान पोहोचल्याचे फोटो टि्वटरवर पोस्ट केले आहेत. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ तीन कसोटी, तीन वनडे आणि एक टी 20 सामना खेळणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचे सामने तटस्थ ठिकाणी म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले आहेत. मागच्यावर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. पाकिस्तानने दोन्ही देशांना कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन दिले होते. पण सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. इंग्लंडच्या संघाने त्यांचा दौरा पुढे ढकलला.
इतर बातम्या
IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला ‘त्या’ अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO