Asia Cup 2022: ‘आता भारतासमोर नाही जिंकू शकतं’, शाहीन आफ्रिदी बाहेर होताच पाकिस्तानच्या दिग्गजाची कबुली

Asia Cup 2022: पाकिस्तानचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिकी (shaheen shah afridi) या स्पर्धेत खेळणार नाहीय. दुखापतीमुळे तो आशिया कपला मुकणार आहे.

Asia Cup 2022: 'आता भारतासमोर नाही जिंकू शकतं', शाहीन आफ्रिदी बाहेर होताच पाकिस्तानच्या दिग्गजाची कबुली
Shaheen Afridi Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:40 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला आठवड्याभराचा अवधी उरला आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यााधी पाकिस्तानला एक झटका बसला आहे. पाकिस्तानचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिकी (shaheen shah afridi) या स्पर्धेत खेळणार नाहीय. दुखापतीमुळे तो आशिया कपला मुकणार आहे. आफ्रिदीची गणना जगातील धोकादायक गोलंदाजांमध्ये होते. आफ्रिदीच्या संघाबाहेर जाण्यावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदने पाकिस्तनी बोर्डाला (PCB) खडे बोल सुनावले आहेत. आशिया कप मध्ये पाकिस्तान भारताचा सामना करु शकणार नाही, असही त्याने म्हटलं आहे.

पाकिस्तानसाठी विजय मिळवणं कठीण

वर्कलोड हे आफ्रिदीच्या दुखापतीमागे एक कारण असल्याचं आकिब जावेदने सांगितलं. “आफ्रिदी सतत क्रिकेट खेळतोय. टीम मॅनेजमेंटने संयम बाळगला पाहिजे. त्यांनी घाबरुन न जाता, गोलंदाजाला बरा होण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे” असं जावेद जिओ न्यूजशी बोलताना म्हणाला. “पाकिस्तानसाठी हा एक मोठा झटका आहे. यात कुठलीही शंका नाही. शाहीद फलंदाजांसमोर असतो, त्यावेळी सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये फलंदाज पाय वाचवू की, विकेट हाच विचार करतो. आफ्रिदी बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. भारताची मधली फळी भक्कम आहे. त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडसर्स आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी विजय मिळवणं अवघड बनलं आहे” असं अकिब जावेद अन्य एका मुलाखतीत म्हणाला.

हसल अली सारखी चूक करु नका

पाकिस्तानने 2 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला हरवलं आहे. एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये आणि दुसऱ्यांदा मागच्यावर्षी वर्ल्ड कप मध्ये. दोन्हीवेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताला दबावाखाली आणलं आणि पाकिस्तानचा संघ जिंकला. आफ्रिदी बाहेर गेल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला दिलासा मिळाला आहे, असं जावेद म्हणाले. आफ्रिदीने पुनरागमन करताना हसन अली सारखी चूक करु नये, असा सल्लाही जावेद यांनी दिला. “गुडघ्याची दुखापत गंभीर असते. जेव्हा तुम्ही उडी मारुन लँड होता, त्यावेळी जॉइंट्स वर दबाव येतो. दुखापत पूर्णपणे बरी झाली नसेल, तर वेगावर परिणाम होतो. तुमचा बॅलन्सही बिघडतो. बोर्डाने आफ्रिदीचे उपचार चांगल्या ठिकाणी करावेत” असा सल्लाही त्यांनी दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.