कॉफी प्यायला येणार?, अहो, चक्क रोहित शर्मा तुम्हाला विचारतोय, पहा ड्रेसिंग रुममधला हा VIDEO

श्रीलंकेविरुद्ध (Ind vs Sl) काल झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit sharma) बॅटने फारशी चमक दाखवू शकला नाही. रोहित काल स्वस्तात बाद झाला.

कॉफी प्यायला येणार?, अहो, चक्क रोहित शर्मा तुम्हाला विचारतोय, पहा ड्रेसिंग रुममधला हा VIDEO
धर्मशाळा येथील भारत-श्रीलंका दुसऱ्या टी 20 सामन्यातील एक क्षणImage Credit source: Photo: Screengrab/BCCI
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 4:25 PM

धर्मशाला: श्रीलंकेविरुद्ध (Ind vs Sl) काल झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit sharma) बॅटने फारशी चमक दाखवू शकला नाही. रोहित काल स्वस्तात बाद झाला. पण कॅप्टन म्हणून मधल्या फळीच्या कामगिरीवर रोहित शर्मा नक्कीच खूष असेल. श्रीलंकेच्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दोन विकेट लवकर गमावले. पण श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आणि संजू सॅमसनने श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. एक अवघड वाटणारं लक्ष्य भारताला सहज पार करता आलं. या तिघांनी लंकन गोलंदाजांवर अक्षरक्ष: हल्लाबोल केला. भारताने हा सामना 17 चेंडू राखून जिंकला. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आता भारताकडे 2-0 आघाडी आहे. आजचा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे.

कालच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत असताना, कॅमेरामनने कॅमेरा ड्रेसिंग रुमकडे फिरवला. त्यावेळी रोहित शर्माच्या हातात गरम कॉफीचं ग्लास होतं. धर्मशाळाच्या थंडगार वातावरणात रोहित शर्मा गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत होता.

कॉफीचे घोट घेत असताना, कॅमेरा आपल्याकडे आहे, हे चटकन रोहितच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याने कॅमराकडे पाहून कॅमेरामनला कॉफी घेणार का? म्हणून विचारणा केली. त्यावेळी रोहितच्या चेहऱ्यावर हास्य होते.

रोहितने कॉफीची विचारणा केल्याचा हा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या टि्वटर हँडलवरुन टि्वट केला. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. पंजाब किंग्सने या व्हिडिओवर गमतीशीर reaction दिली आहे. किंग्स इलेवन पंजाबने प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटातील अक्षय कुमारचा सीन शेअर केला. ‘कोई तो आओ मेरे साथ कॉफी पीने’ असं त्या व्हिडिओत म्हटलं आहे. फॅन्सनी खूपच गंमतीशीर reaction दिल्या आहेत. आज मालिकेतला तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना होणार आहे.

PBKS lead hilarious reactions to Rohit Sharma’s viral video of sipping coffee

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.