PBKS vs CSK highlights, IPL 2022: पंजाब किंग्सचा चेन्नई सुपर किंग्सवर विजय

| Updated on: Apr 26, 2022 | 12:08 AM

Punjab kings vs chennai super kings live score in marathi: पंजाब किंग्सने या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पहिल्यांदा हरवलं होतं. आता दोन्ही संघ आमने-सामने आहेत.

PBKS vs CSK highlights, IPL 2022: पंजाब किंग्सचा चेन्नई सुपर किंग्सवर विजय
PBKS vs CSK Live Score

मुंबई: : IPL 2022 मध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर (PBKS vs CSK) विजय मिळवला आहे. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Apr 2022 11:29 PM (IST)

    पंजाब किंग्सचा चेन्नई सुपर किंग्सवर विजय

    पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या.

  • 25 Apr 2022 11:25 PM (IST)

    मोक्याच्या क्षणी एमएस धोनी OUT

    मोक्याच्या क्षणी एमएस धोनी OUT झाला. ऋषी धवनच्या गोलंदाजीवर 12 धावांवर बेअरस्टोकडे दिला झेला.

  • 25 Apr 2022 11:23 PM (IST)

    दुसरा बॉल वाइड

    दुसरा बॉल वाइड. पाच बॉलमध्ये 20 धावांची गरज. तिसरा चेंडू निर्धाव टाकला.

  • 25 Apr 2022 11:21 PM (IST)

    धोनीचा पहिल्या बॉलवर सिक्स

    धोनीने पहिल्या बॉलवर सिक्स मारला. ऋषी धवन शेवटची ओव्हर टाकतोय.

  • 25 Apr 2022 11:20 PM (IST)

    6 चेंडूत CSK ला विजयासाठी 27 धावांची गरज

    CSK च्या 19 षटकात पाच बाद 161 धावा झाल्या आहेत. 6 चेंडूत CSK ला विजयासाठी 27 धावांची गरज.

  • 25 Apr 2022 11:12 PM (IST)

    स्फोटक फलंदाजी करणारा अंबाती रायुडू बोल्ड

    स्फोटक फलंदाजी करणारा अंबाती रायुडू 78 धावांवर बोल्ड झाला आहे. त्याने सात चौकार, सहा षटकार लगावले. 18 ओव्हर्समध्ये सीएसकेच्या पाच बाद 153 धावा झाल्या आहेत.

  • 25 Apr 2022 11:08 PM (IST)

    18 चेंडूत विजयासाठी 41 धावांची गरज

    CSK ला 18 चेंडूत विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 17 ओव्हर्समध्ये सीएसकेच्या चार बाद 147 धावा झाल्या आहेत. रायुडू नाबाद 77 आणि रवींद्र जाडेजा 7 धावांवर खेळतोय.

  • 25 Apr 2022 10:49 PM (IST)

    अंबाती रायुडूची तुफान फटकेबाजी, हाफ सेंच्युरी पूर्ण

    अंबाती रायुडू तुफान फटकेबाजी करतोय. त्याने 28 चेंडूत षटकार ठोकून अर्धशतक झळकावलं. 15 षटकात सीएसकेच्या चार बाद 118 धावा झाल्या आहेत.

  • 25 Apr 2022 10:39 PM (IST)

    CSK ची महत्त्वाची विकेट, ऋतुराज गायकवाड OUT

    अंबाती रायुडू आणि ऋतुराज गायकवाडची जोडी जमली होती. दोघे फटकेबाजी करत होते. अखेर कागिसो रबाडाने ही जोडी फोडली. ऋतुराजला 30 धावांवर मयंक अग्रवालकरवी झेलबाद केले. 13 षटकात सीएसकेच्या चार बाद 90 धावा झाल्या आहेत.

  • 25 Apr 2022 10:19 PM (IST)

    CSK च्या तीन बाद 64 धावा

    नऊ ओव्हर्समध्ये CSK च्या तीन बाद 64 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा (1), मिचेल सँटनर (9) आणि शिवम दुबे (8) धावांवर आऊट झाला.

  • 25 Apr 2022 09:49 PM (IST)

    CSK ला पहिला झटका, रॉबिन उथाप्पा OUT

    दुसऱ्याच ओव्हरमध्ये रॉबिन उथाप्पाच्या रुपाने सीएसकेची पहिली विकेट गेली. त्याने एक रन्स केला. तीन षटकात एक बाद 13 धावा झाल्या आहेत. ऋतुराज आणि सँटनरची जोडी मैदानात आहे.

  • 25 Apr 2022 09:21 PM (IST)

    धवनमुळे पंजाब किंग्सचं 187 धावांचं ‘शिखर’

    पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार बाद 187 धावा केल्या आहेत. शिखर धवनने 59 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते. लिव्हिंगस्टोनने 7 चेंडूत 19 धावांची स्फोटक खेळी केली. यात एक चौकार आणि दोन षटकार होते.

  • 25 Apr 2022 09:12 PM (IST)

    लियाम लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी

    लियाम लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी. 19 षटकात पंजाबच्या 2 बाद 174 धावा झाल्या आहेत.

  • 25 Apr 2022 09:08 PM (IST)

    शिखर धवनची जबरदस्त फलंदाजी, पंजाबचा डाव सुस्थितीत

    18 षटकात पंजाब किंग्सच्या दोन बाद 152 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 76 धावांवर खेळतोय. लियाम लिव्हिंगस्टोन मैदानात आहे. भानुका राजपक्षे 42 धावांवर आऊट झाला.

  • 25 Apr 2022 08:42 PM (IST)

    शिखर धवनची हाफ सेंच्युरी

    आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळणाऱ्या शिखर धवनने हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 38 चेंडूत त्याने 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. 14 ओव्हरमध्ये पंजाबच्या एक बाद 117 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये 14 धावा निघाल्या

  • 25 Apr 2022 08:33 PM (IST)

    शिखर झाला आक्रमक

    12 षटकात पंजाब किंग्सच्या एक बाद 94 धावा झाल्या आहेत. शिखरने या ओव्हरमध्ये मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर चौकार लगावले.

  • 25 Apr 2022 08:26 PM (IST)

    शिखर धवन-भानुका राजपक्षाची जमली जोडी

    11 षटकात पंजाब किंग्सच्या एक बाद 78 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 31 आणि भानुका राजपक्षा 21 धावांवर खेळतोय.

  • 25 Apr 2022 08:02 PM (IST)

    पावरप्लेमध्ये पंजाब किंग्स एक बाद 37

    पावरप्लेच्या सहा षटकात पंजाब किंग्सच्या एक बाद 37 धावा झाल्या आहेत. कॅप्टन मयंक अग्रवालने 18 धावांवर माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर शिवम दुबेकडे सोपा झेल दिला. धवन 17 धावांवर खेळतोय. आता भानुका राजपक्षे मैदानात आला आहे.

  • 25 Apr 2022 07:51 PM (IST)

    पंजाबच्या बिनबाद 22 धावा

    चार षटकात पंजाबच्या बिनबाद 22 धावा झाल्या आहेत. मयंक 12 आणि शिखर 8 धावांवर खेळतोय.

  • 25 Apr 2022 07:50 PM (IST)

    शिखर धवनच्या 6 हजार धावा पूर्ण

    शिखर धवनने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा शिखर धवन दुसरा खेळाडू आहे.

  • 25 Apr 2022 07:41 PM (IST)

    मयंक अग्रवाल-शिखर धवनची जोडी मैदानात

    दोन षटकात पंजाब किंग्सच्या बिनबाद 13 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवालने या ओव्हरमध्ये एक चौकार लगावला.

  • 25 Apr 2022 07:36 PM (IST)

    पंजाब किंग्सच्या डावाला सुरुवात

    पहिल्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या बिनबाद 4 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन ही सलामीची जोडी मैदानात आहे.

  • 25 Apr 2022 07:27 PM (IST)

    अशी आहे CSK ची Playing -11

    रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि माहीश तीक्ष्णा,

  • 25 Apr 2022 07:25 PM (IST)

    अशी आहे पंजाब किंग्सची Playing -11

    मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षा, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषि धवन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा,

    9 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या शाहरुख खानला पंजाब किंग्सने संधी दिलेली नाही.

Published On - Apr 25,2022 7:22 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.