PBKS vs DC IPL 2022: अरे हे काय, ललित कुठला शॉट खेळायला गेला, कसा OUT झाला ते एकदा बघाच, पंजाबला 160 धावांच टार्गेट

खरंतर दिल्ली कॅपिटल्सला जास्त धावा करता आल्या असत्या. पण लियाम लिव्हिंगस्टोनने वाट लावली. दिल्लीच्या डावात पहिल्याच चेंडूवर आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नरला आऊट केलं.

PBKS vs DC IPL 2022: अरे हे काय, ललित कुठला शॉट खेळायला गेला, कसा OUT झाला ते एकदा बघाच, पंजाबला 160 धावांच टार्गेट
PBKS vs DC Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:31 PM

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्समध्ये (DC vs PBKS) IPL 2022 मधला 64 वा सामना सुरु आहे. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टनचा हा निर्णय पंजाबच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. दिल्लीने निर्धारित 20 षटकात सात बाद 159 धावा केल्या. खरंतर दिल्ली कॅपिटल्सला जास्त धावा करता आल्या असत्या. पण लियाम लिव्हिंगस्टोनने वाट लावली. दिल्लीच्या डावात पहिल्याच चेंडूवर आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नरला आऊट केलं. वॉर्नरला आज भोपळाही फोडता आला नाही. त्याने राहुल चाहरकडे सोपा झेल दिला. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने ऋषभ पंत (7) आणि रोव्हमॅन पॉवेल (2) यांना स्वस्तात आऊट केलं. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण सर्फराज खान आणि मिचेल मार्शची जोडी जमली.

मार्श आणि सर्फराझने पंजाबच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिलं नाही

ललित कुठला शॉट खेळायला गेला, कसा OUT झाला ते एकदा बघाच

पहिली विकेट शुन्यावर गेल्यामुळे पंजाबच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला होता. पण मार्श आणि सर्फराझने पंजाबच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी प्रतिहल्ला चढवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. सर्फराजने 16 चेंडूत 32 धावा केल्या सर्फराज खानने अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू स्लोअर वन होता. सर्फराजला बॉल टाइम करता आला नाही. राहुल चाहरने झेल घेतला. त्यानंतर मार्शने ललित यादवसोबत मिळून डाव सावरला. ललित यादवने 24 धावा केल्या. दिल्लीची मधलीफळी स्थिरस्थावर होऊ शकली नाही. त्यामुळे चांगल्या धावसंख्येनंतरही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मिचेल मार्शची हाफ सेंच्युरी

पहा मिचेल मार्शची कडक हाफ सेंच्युरी

मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात मिचेल मार्शने (63) अर्धशतकी खेळी केली. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. लिव्हिंगस्टोन प्रमाणे अर्शदीपनेही चांगली गोलंदाजी केली. त्याने तीन विकेट काढल्या. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.