PBKS vs DC IPL 2023 Highlight : दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय, लिविंगस्टोनचं अर्धशतक व्यर्थ

| Updated on: May 17, 2023 | 11:50 PM

PBKS vs DC IPL 2023 Highlight : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 15 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे पंजाबच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

PBKS vs DC IPL 2023 Highlight : दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय, लिविंगस्टोनचं अर्धशतक व्यर्थ
PBKS vs DC IPL 2023 Live Update : पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात कोण मारणार बाजी?

मुंबई :  आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 15 धावांनी पराभूत केलं. या विजयासह पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. दिल्ली, हैदराबादनंतर आता पंजाबच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावा केल्या. पंजाबला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पंजाबचा संघ 8 गडी गमवून 198 धावा करू शकला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 17 May 2023 11:25 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update : पंजाबचा डाव

    दिल्लीने विजयासाठी दिलेल्या विजयासाठी दिलेल्या 214 आव्हान गाठण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन ही जोडी मैदानात उतरली. शिखर धवनच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या गड्यासाठी प्रभसिमरन आणि अथर्व तायडे या जोडीने अर्धशतकी खेळी केली. पण दुखापतीमुळे अथर्व तायडे रिडायर्ड हर्ट झाला. त्याने 42 चेंडूत 55 धावा केल्या. त्यानंतर लायम लिविंगस्टोनने मोर्चा सांभाळला. आक्रमक खेळी करत लिविंगस्टोनने सामाना शेवटच्या षटकापर्यंत आणला. एका क्षणी असं वाटत होतं की हा सामना पंजाब जिंकेल पण हा सामना पंजाबने 15 धावांनी गमावला.

    लिविंगस्टोनने मोर्चा सांभाळला असताना जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शाहरुख खान 6 धावा करून तंबूत परतला. सॅम करनकडून खूप आशा असताना 11 धावांवर बाद झाला. हरमनप्रीत ब्रारने लिविंगस्टोनला स्ट्राईक देण्यासाठी धावचीत झाला. त्यानंतर लिविंगस्टोनने शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. मात्र काही एक उपयोग झाला नाही. 94 धावा करून समाधान मानावं लागलं

  • 17 May 2023 11:08 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update : हरप्रीत ब्रार धावचीत

  • 17 May 2023 11:06 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update : सॅम करन 11 धावा करून बाद

  • 17 May 2023 10:59 PM (IST)

    PBKS vs DC : पंजाबला पाचवा धक्का

    पंजाबच्या हातून सामना सुटताना दिसत आहे. अथर्व तायडे रिटायर हर्ट झाल्यावर जितेश शर्मा पाठोपाठ शाहरूख खानही आऊट झाला आहे. 3 बॉलमध्ये 1 सिक्स मारत तो तंबूत परतला आहे. आता मैदानात लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन आहेत.

  • 17 May 2023 10:54 PM (IST)

    PBKS vs DC : पंजाबला लागोपाठ धक्के

    पंजाब किंग्जची चौथी विकेट पडली आहे. जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. नॉर्खियाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आधीच अथर्व तायडे 55 धावा रिटायर हर्ट होत पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

  • 17 May 2023 10:32 PM (IST)

    अथर्व तायडेचं अर्धशतक

    अथर्व तायडे याने 38 चेंडूत 50 धावा करत आपलं दुसरं अर्धशतक केलं आहे. 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

  • 17 May 2023 10:14 PM (IST)

    पंजाबला दुसर झटका

    पंजाब किंग्जची दुसरी विकेट प्रभसिमरन सिंगच्या रूपाने पडली. 19 चेंडूत 22 धावा करून तो बाद झाला. अक्षर पटेलने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंजाबने 8 षटकांत 2 गडी गमावून 55 धावा केल्या. अथर्व तायडे 33 धावा करून खेळत आहे. लिव्हिंगस्टन आता मैदानात उतरला आहे.

  • 17 May 2023 10:01 PM (IST)

    प्रभसिमरन आणि अथर्वने सावरला डाव

    पंजाब किंग्जने 6 षटकांत 1 गडी गमावून 47 धावा केल्या. संघाला विजयासाठी 84 चेंडूत 167 धावांची गरज आहे. अथर्व तायडे 23 तर प्रभसिमरन सिंग 21 धावांवर खेळत आहे.

  • 17 May 2023 09:37 PM (IST)

    पंजाबला पहिला धक्का

    पंजाबचा कर्णधार शिखर धवन दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. ईशांत शर्माने त्याला शून्यावर माघारी पाठवलं आहे. पंजाबसाठी मोठा धक्का आहे.

  • 17 May 2023 09:11 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचं पंजाबसमोर 214 धावांचं आव्हान

    दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावा केल्या. पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान पंजाबचा संघ गाठतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेत हे दोन संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. यापूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने 31 धावांनी विजय मिळवला होता. आतापर्यंत हे दोन संग 31 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापकी 16 सामन्यात पंजाबने, तर 15 सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे.

  • 17 May 2023 09:10 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा डाव

    पंजाबने नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नरने 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने दमदार कमबॅक केलं आहे. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. त्यानंतर पृथ्वी शॉ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जोरदार फटका मारला. पण सीमारेषेवर अथर्व तायडेने त्याचा झेल घेतला. पृथ्वी शॉने 38 चेंडूत 54 धावा केल्या.

    पृथ्वी शॉनंर रिली रोस्सोने मोर्चा सांभाळला. रिली रोस्सोने 37 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याला फिल सॉल्टने चांगली साथ दिली. 14 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

  • 17 May 2023 08:54 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : रिली रोस्सोचं दमदार अर्धशतक

  • 17 May 2023 08:48 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : पृथ्वी शॉ 54 धावा करून बाद

  • 17 May 2023 08:39 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : पृथ्वी शॉचं अर्धशतक

  • 17 May 2023 08:23 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : डेविड वॉर्नर 46 धावा करून तंबूत

  • 17 May 2023 07:55 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : पृथ्वी शॉचा षटकार

  • 17 May 2023 07:48 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ जोडीची सावध सुरुवात

  • 17 May 2023 07:08 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीची प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

  • 17 May 2023 07:07 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : पंजाबची प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

  • 17 May 2023 07:01 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, गोलंदाजीचा निर्णय

  • 17 May 2023 06:10 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : पंजाबचा संपूर्ण संघ

    पंजाबचा पूर्ण : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.

  • 17 May 2023 06:09 PM (IST)

    PBKS vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा संपूर्ण संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Published On - May 17,2023 6:07 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.