PBKS vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊने वचपा घेतलाच, पंजाबवर 56 धावांनी विजय

| Updated on: Apr 28, 2023 | 11:41 PM

PBKS vs LSG IPL 2023 Highlights In Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल 2023 या 16 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने होते. या सामन्यात लखनऊने पंजाबवर विजय मिळवला.

PBKS vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊने वचपा घेतलाच, पंजाबवर 56 धावांनी विजय

मोहाली | आयपीएल 16 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दोन्ही संघांची या हंगामात समोरासमोर येण्याची ही दुसरी वेळ होती. या सामन्याचं आयोजन हे मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. पंजाब किंग्सने 15 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 2 विकेट्सने मात केली होती.त्यामुळे आता या सामन्यात पंजाब पुन्हा मात करणार, की लखनऊ आपल्या होम ग्राउंडवरील पराभवाचा वचपा घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र लखनऊने पंजाबवर 56 धावांनी मात करत मागील पराभवाचा वचपा घेतला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Apr 2023 11:40 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊचा मोसमातील पाचवा विजय

    लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर 56 धावांनी विजय मिळवला. लखनऊचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. लखनऊने पहिले बॅटिंग करताना पंजाबला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 201 धावाच करता आल्या.

  • 28 Apr 2023 11:24 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाबला नववा झटका

    पंजाबने नववी विकेट गमावली आहे. कगिसो रबाडा भोपळा न फोडता आऊट झाला आहे.

  • 28 Apr 2023 11:09 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लियाम लिविंगस्टोन आऊट

    पंजाबने पाचवी विकेट गमावलीआहे. लियाम लिविंगस्टोन 23 धावांवर बाद झाला.

  • 28 Apr 2023 10:46 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | सिंकदर रजा आऊट

    पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे.  सिंकदर रजा 22 बॉलमध्ये 36 रन्स करुन आऊट झाला.

  • 28 Apr 2023 10:00 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाबला दुसरा झटका

    पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. शिखर धवन याच्यानंतर प्रभासिमरन सिंह 9 धावा करुन माघारी परतला.

  • 28 Apr 2023 09:40 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | शिखर धवन आऊट

    पंजाब किंग्सला मोठा झटका लागला आहे. शिखर धवन आऊट झाला आहे. धवन 1 धावा करुन माघारी परतला.

  • 28 Apr 2023 09:38 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभासिमरन सिंह आणि शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. पंजाबसमोर विजयासाठी 258 धावांचं आव्हान आहे.

  • 28 Apr 2023 09:24 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊचा कारनामा, पंजाबला 258 धावांचं आव्हान

    लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. लखनऊच्या सर्वच फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च दुसरी धावसंख्या ठरली. लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस याने 40 चेंडूत सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. कायले मेयर्स याने 24 बॉलमध्ये 54 रन्सचं योगदान दिलं. निकोलस पूरन याने 45 धावा केल्या. आयुष बदोनी 43 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन केएल राहुल 12 धावांवर आऊट झाला. दीपक हुड्डा याने नाबाद 11 आणि कृणाल पंड्याने 5* धावा केल्या. तर पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. सॅम करण, अर्शदीप सिंह आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 28 Apr 2023 09:00 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ 200 पार

    लखनऊ सुपर जांयट्सने 200 धावा पूर्ण केल्या आहेत. लखनऊच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली.

  • 28 Apr 2023 08:43 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला तिसरा धक्का

    लखनऊने तिसरी विकेट गमावली आहे.  आयुष बदोनी 24 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 चौकरांच्या मदतीने  43 धावा केल्या.

  • 28 Apr 2023 08:02 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | कायले मेयर्स आऊट

    लखनऊने दुसरी विकेट गमावली आहे. कगिसो रबाडा याने डोकेदुखी ठरत असलेल्या कायले मेयर्स याला कॅप्टन शिखर धवनच्या हाती कॅच आऊट केलं. मेयर्सने 24 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली.

  • 28 Apr 2023 07:56 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | कायले मेयर्स याचं अर्धशतक

    लखनऊ सुपर जायंट्सचा सलामी फलंदाज कायले मेयर्स याने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 28 Apr 2023 07:48 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला पहिला झटका

    आश्वासक आणि वेगवान सुरुवातीनंतर लखनऊला पहिला झटका लागला आहे. पंजाबच्या कगिसो रबाडा याने लखनऊ कॅप्टन केएल राहुल याला 12 धावांवर आऊट केलंय.

  • 28 Apr 2023 07:30 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात

    लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स ही सलामी जोडी मैदानात आहे. पंजाबने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 28 Apr 2023 07:14 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.

  • 28 Apr 2023 07:11 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

    लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपर हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.

  • 28 Apr 2023 07:03 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाबने टॉस जिंकला

    पंजाब किंग्स टीमने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या या सामन्यातही पुन्हा एकदा टॉस जिंकला आहे. कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 28 Apr 2023 06:58 PM (IST)

    PBKS vs LSG IPL 2023 Live Score | पंजाब विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत

    पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ या मोसमात एकूण दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधीच्या सामन्यात पंजाबने लखनऊवर विजय मिळवला होता. आता या सामन्यात कोण विजेता होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

Published On - Apr 28,2023 6:54 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.