PBKS vs RR IPL 2023 Highlights | राजस्थान रॉयल्सचा 4 विकेट्सने विजय, आता पुढे काय?

| Updated on: May 20, 2023 | 12:35 AM

PBKS vs RR IPL 2023 Highights In Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी पंजाब किंग्सने 5 एप्रिल रोजी राजस्थानवर 5 धावांनी विजय मिळवला होता. तर आता राजस्थानने 4 विकेट्सने विजय मिळवत हिशोब चुकता केला आहे.

PBKS vs RR IPL 2023 Highlights | राजस्थान रॉयल्सचा 4 विकेट्सने विजय, आता पुढे काय?

धर्मशाळा | आयपीएल 16 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानने या विजयासह मागील पराभवाचा वचपा घेतला.  हे दोन्ही संघ या मोसमात याआधी 5 एप्रिल रोजी भिडले होते. तेव्हा पंजाबने राजस्थानला पराभूत केलं होतं. पंजाबने राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 May 2023 11:30 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानचा 4 विकेट्सने विजय

    राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  राजस्थानला  हे आव्हान नेट रन रेटच्या हिशोबाने 18. 3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र त्याआधी राजस्थानला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आलं. मात्र  राजस्थानच्या या विजयानंतरही  प्लेऑफच्या आशा या जरतरच्या समीकरणारवर कायम आहे.

  • 19 May 2023 11:19 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज

    राजस्थान रॉयल्सला विजयासाठी आता 20 व्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज आहे. ध्रुव जुरेल आणि ट्रेन्ट बोल्ट ही जोडी मैदानात आहे.

  • 19 May 2023 11:18 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | शिमरॉन हेटमायर आऊट

    राजस्थानने सहावी विकेट गमावली आहे. शिखर धवनने कडक कॅच घेत शिमरॉन हेटमायरल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हेटमायरने 28 बॉलमध्ये 46 धावांची खेळी केली.

  • 19 May 2023 11:12 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | रियान पराग आऊट, राजस्थानला पाचवा झटका

    राजस्थानने पाचवी विकेट गमावली आहे. रियान पराग 20 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 19 May 2023 11:10 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | रियान परागचा धमाका, सलग 2 सिक्स

    रियान पराग याने 18 व्या ओव्हरच्या सुरुवातीला सलग 2 सिक्स खेचले आहेत. कगिसो रबाडा याने नो बॉलने सुरुवात केली. त्यामुळे फ्री हिट  मिळाला.  रियानने फ्रि हिटवर सिक्स ठोकला. त्यानंतर परत रियानने सिक्स ठोकला. यामुळे सामन्यात रंगत आली.

  • 19 May 2023 11:08 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानला 3 ओव्हरमध्ये 33 धावांची गरज

    पंजाब विरुद्ध राजस्थान सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. राजस्थान विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 33 धावांची गरज आहे.  शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग ही जोडी मैदानात आहे.

  • 19 May 2023 10:48 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | यशस्वी जयस्वाल आऊट

    यशस्वी जयस्वाल आऊट झाला आहे. ऋषी धवनने यशस्वीचा शानदार कॅच घेतला. यशस्वी 36 बॉलमध्ये 50 धावा करुन आऊट झाला.

  • 19 May 2023 10:46 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | यशस्वी जयस्वाल याचं अर्धशतक

    यशस्वी जयस्वाल याने 35 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. यशस्वीचं या मोसमातील हे 5 वं शतक ठरलं. राजस्थान यासह विजयाच्या दिशेने जवळ पोहचली आहे.

  • 19 May 2023 10:27 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानला तिसरा धक्का, संजू सॅमसन आऊट

    राजस्थान रॉयल्सला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन संजू सॅमसन 2 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 19 May 2023 10:21 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | देवदत्त पडीक्कल अर्धशतकी खेळीनंतर आऊट

    देवदत्त पडिक्कल अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झाला आहे.  पडीक्कलने 30 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली.

  • 19 May 2023 10:09 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    जॉस बटलर शून्यावर आऊट झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. यशस्वीने चौकार ठोकला यासह ही अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली.

  • 19 May 2023 09:43 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | बटलर झिरोवर आऊट

    राजस्थानची निराशाजनक सुरुवात झाली आहे. कगिसो रबाडा याने बटलरला झिरोवर आऊट केलं आहे.

  • 19 May 2023 09:37 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. पंजाबने राजस्थानसमोर विजयासाठी 188 धावाचं आव्हान ठेवलं आहे.

  • 19 May 2023 09:35 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान

    सॅम करन आणि शाहरुख खान या जोडीने केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबची फारशी चांगली सुरुवात राहिली नाही. प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, कॅप्टन शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन आऊट झाल्याने पंजाबची 6.3 ओव्हरमध्ये 4 बाद 50 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर जितेश शर्मा, सॅम करन आणि शाहरुख खान या तिकडीने तडाखेदार खेळी केली.

    सॅम करन आणि जितेश शर्मा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 64 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर जितेशला नवदीप सैनीने आऊट केलं. जितेशने 28 बॉलमध्ये 3 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेल्या शाहरुखने सॅम करनला चांगली साथ दिली या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 38 बॉलमध्ये नाबाद 73 धावांची भागीदारी केली. या दरम्यान शाहरुख आणि सॅम या दोघांनी दे दणादण बॅटिंग केली.

    पंजाबसाठी सॅम करन याने 31 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स ठोकत सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. तर शाहरुखने 23 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह नॉट आऊट 41 रन्स केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

  • 19 May 2023 09:12 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | शाहरुख-सॅम दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    सॅम करन आणि शाहरुख खान या जोडीने सहाव्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. तसेच युझवेंद्र चहल याने सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा दिल्या.  आता या धावा किती निर्णायक ठरतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • 19 May 2023 08:44 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पंजाबला पाचवा झटका

    पंजाबनने पाचवी विकेट गमावली आहे.  नवदीप सैनीने दजितेश शर्मा याला 44 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 19 May 2023 08:39 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पंजाबची पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    सॅम करन आणि जितेश शर्मा या जोडीने पंजाबसाठी पाचव्या विकेसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे पंजाबचा स्कोअर 13 ओव्हरमध्ये 4 बादर 100 असा झाला आहे.  या दोघांनी 43 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी केली.

  • 19 May 2023 08:08 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | लियाम लिविंगस्टोन आऊट, पंजाब बॅकफुटवर

    लियाम लिविंगस्टोन आऊट झाल्याने पंजाब किंग्स बॅकफुटवर गेली आहे.  नवदीप सैनी याने लिविंगस्टोन याला क्लिन बोल्ड केलंय. त्यामुळे पंजाबची 6.3 ओव्हरमध्ये 4 बाद 50 अशी स्थिती झाली आहे.

  • 19 May 2023 08:01 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | शिखर धवन आऊट

    एडम झॅम्पा याने  पंजाब किंग्स कॅप्टन शिखर धवन याला 17 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

  • 19 May 2023 07:53 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | अथर्व तायडे आऊट

    पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे.  अथर्व तायडे याला नवदीप सैनी याने आऊट केलं आहे.  तायडेने 19 धावा केल्या. तायडेचं हे या मोसमातील पहिलीच विकेट ठरली.

  • 19 May 2023 07:32 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका

    ट्रेन्ट बोल्टने पंजाब किंग्सला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे.  बोल्टने आपल्या बॉलिंगवर प्रभसिमरन सिंह याला 2 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 19 May 2023 07:15 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, एडम झॅम्पा, ट्रेन्ट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल

  • 19 May 2023 07:13 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन) प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

  • 19 May 2023 07:09 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला

    राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे.  कॅप्टन संजू सॅमसन याने पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे पंजाब आपल्या घरच्या मैदानात राजस्थानला विजयासाठी किती धावांचं आव्हान देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 19 May 2023 06:54 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने

    पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आयपीएल इतिहासात एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आकड्यांच्या हिशोबाने राजस्थान रॉयल्स वरचढ आहे. राजस्थानने 14 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने राजस्थानवर 11 वेळा मात केलीय.

  • 19 May 2023 06:46 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

    ताज्या आकडेवारीनुसार राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे 6 व्या आणि 8 व्या क्रमांकावर विराजमान आहे. दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघांनी खेळलेल्या 13 पैकी 6 सामन्यात विजय मिळवलाय. मात्र राजस्थानचा नेट रनरेट हा प्लसमध्ये असल्याने ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर पंजाबचा नेट रनरेट हा मायन्समध्ये आहे.

  • 19 May 2023 06:38 PM (IST)

    PBKS vs RR IPL 2023 Live Score | पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने

    आयपीएल 16 व्या मोसमात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 5 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 5 धावांनी विजय मिळवला होता.  प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे आता या सामन्यात राजस्थान मागील पराभवाचा वचपा घेत प्लेऑफच्या दिशेने पुढचं पाऊल टाकणार की पंजाब किंग्स बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Published On - May 19,2023 6:33 PM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.