AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RR : पंजाब किंग्सला रोखण्यात यश, राजस्थानचा सलग दुसरा विजय, पीबीकेएसचा 50 धावांनी धुव्वा

Punjab Kings vs Rajasthan Royals Match Result : राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिला आणि एकूण दुसरा सामना जिंकला आहे. राजस्थान यासह पंजाबचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी ठरली.

PBKS vs RR : पंजाब किंग्सला रोखण्यात यश, राजस्थानचा सलग दुसरा विजय, पीबीकेएसचा 50 धावांनी धुव्वा
PBKS vs RR Match Result Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 05, 2025 | 11:36 PM
Share

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 18 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 50 धावांनी धुव्वा उडवला आहे. राजस्थानने पंजाबला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या. राजस्थानने यासह पंजाबचा विजयी रथ रोखला. राजस्थानचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. संजू समॅसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वात राजस्थानने ही कामगिरी केली.

पंजाबची बॅटिंग

विजयी लक्ष्याचं पाठलाग करायला उतरलेल्या पंजाबची निराशाजनक सरुवात राहिली. कगिसो रबाडाने पंजाबला पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. रबाडाने प्रियांश आर्या याला पंजाबच्या डावातील पहिल्याच बॉलवर बोल्ड केलं. त्यानतंर सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यर याला 10 धावांवर आऊट करत पंजाबला दुसरा धक्का दिला. राजस्थानने त्यानंतर पंजाबला आणखी 2 झटके दिले. मार्कस स्टोयनिस 1 आणि प्रभसिमरन सिंह 17 धावांवर बाद झाले. त्यामुळे पंजाबची 4 बाद 43 अशी स्थिती झाली.

त्यानंतर नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 88 धावांची भागादारी केली आणि पंजाबच्या आशा कायम ठेवल्या. मात्र राजस्थान मोक्याच्या क्षणी सामन्यात कमबॅक केलं. राजस्थानने ग्लेम मॅक्सवेल आणि नेहल वढेरा या दोघांना मागोमाग आऊट केलं आणि विजयाचा मार्ग मोकळा केला. नेहलने 62 धावा केल्या. नेहल पंजाबसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर ग्लेन मॅक्सवेल याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा केल्या. ही सेट जोडी ढेर झाल्यानंतर पंजाबच्या पराभवाची औपचारिकताच उरली होती.

त्यानंतर शेवटच्या 5 पैकी फक्त शशांक सिंह याने नाबाद 10 धावा केल्या. तर इतर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. संदीप शर्मा आणि महीश तीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कुमार कार्तिकेय आणि वानिंदू हसरंगा यो जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

राजस्थानचा सलग आणि एकूण दुसरा विजय

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, युद्धवीर सिंग चरक आणि संदीप शर्मा.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.