IPL 2023 सुरु होण्याआधी किती खेळाडूंना दुखापती? दोन टीम्सना सर्वात जास्त फटका, यादी एका क्लिकवर

IPL 2023 सुरु होण्याआधी किती खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर. टुर्नामेंट सुरु होण्याआधीच टीम्सना झटके बसतायत. त्याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होईल.

IPL 2023 सुरु होण्याआधी किती खेळाडूंना दुखापती? दोन टीम्सना सर्वात जास्त फटका, यादी एका क्लिकवर
IPL 2023
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:47 AM

IPL 2023 Injury List : इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे दिवस जसजसे जवळ येतायत, तसतशी दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. IPL ही क्रिकेट विश्वात सर्वाधिक पाहिली जाणारी लीग स्पर्धा आहे. ही लीग सुरु होण्याआधी किंवा त्यानंतर खेळाडूंना सतत दुखापती होत असतात. हे वर्ष सुद्धा याला अपवाद नाहीय. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम्सना दुखापतीचा सर्वात जास्त फटका बसलाय. मुंबईचे दोन आणि दिल्लीच्या तीन खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. ही यादी इथेच संपत नाही.

पंजाब किंग्सने जॉनी बेयरस्टोच्या जागी पर्यायी खेळाडू निवडण्याची मागणी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे दोन, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या एका प्लेयरला दुखापत झालीय.

दिल्लीला जास्त फटका

दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत दुखापतीचा सर्वात जास्त फटका बसलाय. ऋषभ पंत अपघातामुळे पुढचे काही महिने खेळू शकणार नाहीय. तो दिल्ली टीमचा कॅप्टन होता. एनरिच नॉर्त्जे आणि सर्फराज खान या तीन प्लेयर्सना दुखापती झाल्या आहेत.

Mumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6 वी IPL ट्रॉफी वाचा सविस्तर

मुंबईचे दोन प्लेयर OUT

दिल्ली खालोखाल पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमला धक्का बसलाय. क्रिकेट विश्वतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच बलस्थान आहे. पण दुखापतीमुळे तो यंदाच्या सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय. झाई रिचर्ड्सन हा मुंबईचा दुसरा खेळाडू हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे बाहेर गेलाय.

चेन्नईचे कुठले दोन प्लेयर OUT?

मुंबई इंडियन्स खालोखाल चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील यशस्वी टीम आहे. त्यांना सुद्धा दुखापतीचा फटका बसलाय. बेन स्टोक्सला त्यांनी आयपीएल ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. पण गुडघे दुखापतीमुळे स्टोक्स या स्पर्धेत खेळू शकणार नाहीय. कायली जेमीसन बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर पाठदुखीमुळे खेळू शकणार नाहीय.

दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी

जसप्रीत बुमराह (MI)

झाई रिचर्ड्सन (MI)

ऋषभ पंत (DC)

सर्फराज खान (DC)

एनरिच नॉर्त्जे (DC)

बेन स्टोक्स (CSK)

कायली जेमीनसन (CSK)

जॉन बेअरस्टो (PBKS)

प्रसिद्ध कृष्णा (RR)

श्रेयस अय्यर (KKR)

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.