Video : सलग 6 सिक्स ठोकत Pandya चा हाहाकार! 12 सिक्स, 436 चा स्ट्राईक रेट, तरिही का टीम का हरली?
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नावाची चर्चा आहे. गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) पहिल्याच सीजनमध्ये हार्दिक पंड्याने IPL चॅम्पियन बनवलं.
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नावाची चर्चा आहे. गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) पहिल्याच सीजनमध्ये हार्दिक पंड्याने IPL चॅम्पियन बनवलं. हार्दिक पंड्याने आता टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T 20 मालिकेत तो प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पंड्याच्या फलंदाजीच जुनं स्फोटक रुप पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत. हार्दिक पंड्याकडे लांबलचक षटकार मारण्य़ाची क्षमता आहे. लवकरच त्याची तशी फलंदाजी पहायला मिळेल. पण सध्या आणखी एक पंड्याने आपल्या फलंदाजीने हाहाकार उडवून दिला आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये सलग 6 SIX मारुन युवराज सिंग सारखी कमाल केली. तुम्हाला वाटले आम्ही हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या बद्दल बोलतोय. पण तुमचा अंदाज चुकीचा आहे.
120 चेंडूच्या या खेळातू एकूण 36 षटकार
T 10 च्या एका स्पर्धेत षटकारांचा हा पाऊस पडला. दोन्ही संघांनी 150 पेक्षा जास्त धावा केल्या. एकूण 20 षटकाच्या खेळात 300 पेक्षा जास्त धावा झाल्या. 120 चेंडूच्या या खेळातू एकूण 36 षटकार ठोकण्यात आले. त्यात एकट्या पंड्याने 12 षटकार ठोकले.
रॉ़यल्सच्या गोलंदाजांचा समाचार
पुडुचेरीच्या एका T 10 स्पर्धेत गोलंदाजांचीही धुलाई झाली. स्थानिक खेळाडूंच्या या स्पर्धेत धावांचा पाऊस पडला. रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 158 धावांचे लक्ष्य दिले होते. पॅट्रियट्स कडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कृष्णा पंड्याने रॉ़यल्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣
He has done the unthinkable! #KrishnaPandey shows what’s possible with his heart-stirring hits!
Watch the Pondicherry T10 Highlights, exclusively on #FanCode ? https://t.co/GMKvSZqfrR pic.twitter.com/jfafcU8qRW
— FanCode (@FanCode) June 4, 2022
पंड्याने 9 व्या ओव्हरपर्यंत धुलाई सुरु ठेवली
कृष्णा पंड्याने नितेश ठाकूरच्या 6 व्या ओव्हरमध्ये जोरदार प्रहार केला. त्याने सलग सहा चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. त्याने 6 षटकार ठोकले. कृष्ण पंड्याने 9 व्या ओव्हरपर्यंत धुलाई सुरु ठेवली. त्याने 18 चेंडूत 83 धावा फटकावल्या. त्याने 436 च्या स्ट्राइर रेटने फलंदाजी केली. त्याने 12 षटकार आणि दोन चौकार ठोकले. 9 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो आऊट झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 138 होती. शेवटच्या 7 चेंडूत विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. पण पॅट्रियट्सला त्या धावा करता आल्या नाहीत. कृष्णा पंड्याची धमाकेदार इनिंग वाया गेली.