AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शाहीन आफ्रिदी खवळला, डायरेक्ट मैदानात पोलार्डला भिडला, मैदानात ‘राडा’

PSL 2023 : बॉलरने एखाद्या बॅट्समनला OUT केल्यानंतर त्याची गळाभेट घेल्याचे व्हिडिओ समोर आले होते. पण प्लेऑफचे सामने सुरु झाल्यानंतर सगळं बदलून गेलय.

Video :  शाहीन आफ्रिदी खवळला, डायरेक्ट मैदानात पोलार्डला भिडला, मैदानात 'राडा'
psl 2023Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 16, 2023 | 8:04 AM
Share

PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीगचा चालू सीजन अंतिम टप्प्यावर आहे. टुर्नामेंटमध्ये प्लेऑफचे सामने सुरु आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या मॅचेसमध्ये खेळाडूंच परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण वर्तन दिसून आलय. मैदानातील खेळाडूंच्या मैत्रीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. बॉलरने एखाद्या बॅट्समनला OUT केल्यानंतर त्याची गळाभेट घेल्याचे व्हिडिओ समोर आले होते. पण प्लेऑफचे सामने सुरु झाल्यानंतर सगळं बदलून गेलय. पीएसएलमध्ये ती वेळ जणू निघून गेलीय, असं वाटतं.

काल मुल्तान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्समध्ये सामना झाला. यावेळी कायरन पोलार्ड आणि शाहीन आफ्रिदी परस्परांना भिडले. लाहोरमध्ये बुधवारी 15 मार्चला टुर्नामेंटमधील प्लेऑफचा पहिला सामना झाला.

पोलार्डने केली धुलाई

लाहोर आणि मुल्तानमध्ये क्वालिफायरचा पहिला सामना झाला. मुल्तान टीमने पहिली बॅटिंग केली. मुल्तान टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 160 धावा केल्या. यात वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑलराऊंडर आणि माजी कर्णधार कायरन पोलार्डने सर्वात जास्त योगदान दिलं. पोलार्डने 34 चेंडूत 57 धावा कुटल्या.

पोलार्डने जीवनदानाचा उचलला फायदा

पोलार्डने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. डेथ ओव्हर्समध्ये त्याने लाहोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. लाहोरचा कॅप्टन आणि दिग्गज पाकिस्तानी बॉलर शाहीन आफ्रिदी 19 वी ओव्हर टाकत होता. पोलार्डने त्याच्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकले. चौथ्या चेंडूवर पोलार्डचा सोपा झेल सुटला. पोलार्डने या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने ओव्हरच्या लास्ट बॉलवर पुन्हा सिक्स मारला. आफ्रिदीच्या या ओव्हरमध्ये 20 धावा लुटल्या.

नेमकं काय घडलं?

शाहीन आफ्रिदी मैदानावर आक्रमक वेगवान गोलंदाज असला, तरी त्याच्या वर्तनात कधी आक्रमकता दिसत नाही. अचानक झालेल्या या आक्रमणामुळे तो सुद्धा हैराण झाला. त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं नाही. ओव्हर संपल्यानंतर आफ्रिदी काहीतरी बोलत सुटला. पोलार्डने देखील त्याला प्रत्युत्तर दिलं. अचानक शाहीन आफ्रिदीने पलटी मारली. तो पोलार्डच्या जवळ जाऊन काहीतरी बोलू लागला. मैदानावरील वातावरण तापलं होतं. आफ्रिदीसाठी खराब दिवस

शाहीन आफ्रिदीला या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. इनिंगच्या सुरुवातीला तो विकेट काढून देतो. पण या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये त्याला एकही विकेट काढता आली नाही. पोलार्डच्या आक्रमणामुळे त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी बिघडली. शाहीन आफ्रिदीने 4 ओव्हर्समध्ये 47 धावा दिल्या. बॅटनेही तो टीमसाठी योगदान देऊ शकला नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.