Shikhar Dhawan PBKS: आता ‘त्या’ मुलीला नक्कीच पश्चाताप होत असेल, शिखर धवनची फसलेली Love Story
Shikhar Dhawan PBKS: यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाब किंग्सकडून खेळतोय. आज गुजरात टायटन्स विरुद्ध PBKS चा संघ मैदानात उतरणार आहे.
मुंबई: यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाब किंग्सकडून खेळतोय. आज गुजरात टायटन्स विरुद्ध PBKS चा संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी शिखर धवनने त्याच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट (Love affair) सांगितली आहे. पंजाब किंग्सच्या ऑफिशिअल इंटरव्ह्यूमध्ये शिखर धवनने त्याची प्रेमाची आठवण सांगितली. शिखरने एका मुलीबद्दल सांगितलं. त्याने तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण त्या मुलीने शिखरचा प्रस्ताव धुडकावून लावला. कुठल्याही मुलासाठी नकार पचवणं कठीण असतं. तो आतमधून कोसळून जातो. पण शिखर धवन त्यापैकी नव्हता. मुलीकडून नकार मिळाल्यानंतर शिखरने त्या मुलीला जे सांगितलं, त्याचा निश्चित आज तिला पश्चाताप होत असेल. शिखर धवन भारताच प्रमुख डावखुरा फलंदाज आहे.
शिखर धवन त्या मुलीला असं नेमकं बोलला तरी काय? ज्यामुळे आज तिला पश्चाताप होत असेल. पंजाब किंग्सच्या बसमध्ये शिखरने ही मुलाखत दिली.
मी तिच्याकडे माझं प्रेम व्यक्त केलं
“मला एक मुलगी आवडली होती. मी तिच्याकडे माझं प्रेम व्यक्त केलं. पण तिने नकार दिला. त्यावेळी मी तिला एवढच म्हटलं की, तू मला नाही, तर कोहिनूर हिरा गमावला आहेत”, शिखरने बसमध्ये मुलाखतीत हा किस्सा सांगितला. शिखर आज एक यशस्वी क्रिकेटपटू आहे. पण त्यावेळी त्याचा यशस्वी क्रिकेटपटू बनण्यासाठी प्रवास सुरु होता.
Fun is bound when Shikhar is around! ?
? | ??????? ?????? ??????? getting candid with Shashi is nothing but a laugh riot ?#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @SDhawan25 pic.twitter.com/xdH3TZJXAD
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 6, 2022
अन्य प्रश्नांची सुद्धा उत्तर दिली
शिखरने या मुलाखतीत त्याच्या प्रेमा बरोबरच अन्य प्रश्नांची सुद्धा उत्तर दिली. फॅन्सशी संबंधित प्रश्नांनाही त्याने उत्तर दिली. शिखर बसमध्ये असताना काही क्रेझी चाहते बसचा पाठलाग करत होते. यात मुलीसुद्धा होत्या. पंजाब किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तीन पैकी दोन सामने त्यांनी जिंकले आहेत. शिखरने या तिन्ही मॅचमध्ये विशेष कामगिरी केलेली नाही. त्याने आतापर्यंत फक्त 92 धावा केल्या आहेत.