IPL 2023 : 2 खेळाडूंवर 20.75 कोटी रुपये खर्च केले, तेच नाही खेळणार पहिला सामना

IPL 2023 : या दोघांपैकी एकाने मागचा सीजन आपल्या तडाखेबंद बॅटिंगने गाजवला होता. दोन्ही मोठे खेळाडू असून एकहाती मॅच फिरवण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे या दोघांच्या न खेळण्याचा फटका बसू शकतो.

IPL 2023 : 2 खेळाडूंवर 20.75 कोटी रुपये खर्च केले, तेच नाही खेळणार पहिला सामना
liam livingstoneImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 9:15 AM

IPL 2023 PBKS News : आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी पंजाब किंग्सच्या टीमची जोरदार तयारी सुरु आहे. अजूनपर्यंत एकदाही या टीमला आयपीएलच विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदाच्या सीजनला सुरुवात होण्याआधीच पंजाब किंग्सच्या टीमला झटका बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये पंजाबला आपला पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळायचा आहे. 1 एप्रिलला ही मॅच होणार आहे. या सामन्यात पंजाबचे दोन मोठे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

माडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबची टीम आपल्या पहिल्या सामन्यात स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनशिवाय उतरणार आहे. लियाम लिव्हिंगस्टोनला अजून फिटनेस क्लियरन्स मिळालेला नाही. त्याला पाकिस्तान विरुद्ध टेस्ट सीरीज दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून लिव्हिंगस्टोन एकही मॅच खेळलेला नाही.

फिटनेस क्लियरन्सची प्रतिक्षा

लिव्हिंगस्टोनला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हिरवा झेंडा दाखवलाय पण अजूनही या प्लेयरला फिटनेस क्लियरन्स दिलेला नाही.

वेगवान गोलंदाजही मुकणार

फक्त लिव्हिंगस्टोनच नाही, पंजाबचा आणखी एक मोठा खेळाडू पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीय. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तो नेदरलँड्स विरुद्ध देन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे.

दोघांवर किती रक्कम खर्च केलीय?

पंजाबच्या टीमने या दोन खेळाडूंवर 20.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. रबाडाची किंमत 9.25 कोटी रुपये आहे. लिव्हिंगस्टोनला 11.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. PBKS Full Squad : शिखर धवन (कॅप्टन), भानुका राजपक्षे, हरप्रीत बरार, लियम लिव्हिंगस्टोन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सॅम करन, सिकंदर रजा, शिवम सिंह, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.