TNPL 2023 : पंजाब किंग्सने ज्याला IPL 2023 मध्ये एक ओव्हर दिली नाही, तो TNPL मध्ये बनला टॉप बॉलर
TNPL 2023 : IPL 2023 मध्ये तो पंजाब किंग्सकडून एकूण 14 सामने खेळला. पण त्याला एकाही मॅचमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याच्या टीमने रविचंद्रन अश्विनच्या टीमला हरवलं. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये हा गोलंदाज धुमाकूळ घालतोय.
चेन्नई : पंजाब किंग्सने IPL 2023 मध्ये ज्या गोलंदाजाला एकही ओव्हर टाकण्याची संधी दिली नाही, तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालतोय. TNPL 2023 च्या टॉप 2 बॉलर्समध्ये तो आहे. आयपीएल 2023 मध्ये तो पंजाब किंग्सकडून एकूण 14 सामने खेळला. पण त्याला एकाही मॅचमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याला फक्त बॅटिंगची संधी मिळाली. त्याने 156 धावा केल्या.
चेंडूने आपण तो काय करु शकतो, ते त्याने टीएनपीएलमध्ये सिद्ध केलं. लीगमध्ये 2 टॉप बॉलर आहेत. लीगच्या 16 व्या सामन्यात लाइका कोवई किंग्सकडून खेळताना त्याने 2 विकेट काढले. अशा प्रकारे 9 विकेटसह शाहरुख खान पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. पण ही पर्पल कॅप फारवेळ त्याच्याकडे राहिली नाही.
आता दोघांमध्ये स्पर्धा
पुढच्याच सामन्यात आयड्रीम तिरुप्पुरचा भुवनेश्वर 4 विकेट काढून शाहरुख खानच्या पुढे निघून गेला. आता दोघांमध्ये स्पर्धा आहे. भुवनेश्वरने 4 सामन्यात एकूण 10 विकेट काढले. शाहरुखच्या नावावर 5 सामन्यात 9 विकेट आहेत.
टीमसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
शाहरुख खान आपल्या टीमसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सिद्धार्थ आणि एम मोहम्मद यांच्या नावावर प्रत्येकी 6-6 विकेट आहेत. शाहरुख कोवाईचा कॅप्टन सुद्धा आहे. त्यांच्या टीमने आर. अश्विनच्या डिंडीगुल ड्रॅग्नसला 59 धावांनी हरवलं.
View this post on Instagram
अश्विनच्या टीमला हरवलं
पहिली फलंदाजी करताना कोवाईने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 206 धावा केल्या. कोवाईसाठी साई सुदर्शनने 41 चेंडूत 83 धावा चोपल्या. कॅप्टन शाहरुखने 11 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेली ड्रॅग्नसची टीम 19.1 ओव्हर्समध्ये 147 धावांवर ऑलआऊट झाली. शाहरुखने शिवम सिंहला 61 आणि शरत कुमारला 36 रन्सवर आऊट केलं.