PBKS vs KKR IPL 2021 Match 21 Results: पराभवांची मालिका खंडित, कोलकात्याची पंजाबवर 5 विकेट्सने मात

| Updated on: Apr 26, 2021 | 11:12 PM

आयपीएल (IPL 2021) स्पर्धेत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ भिडणार आहेत.

PBKS vs KKR IPL 2021 Match 21 Results: पराभवांची मालिका खंडित, कोलकात्याची पंजाबवर 5 विकेट्सने मात
Punjab Kings vs Kolkata Knight Riders

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील 20 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ भिडले. या सामन्यात कोलकात्याने पंजाबवर 5 विकेट्स आणि 20 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासोबतच कोलकात्याने यंदाच्या स्पर्धेतील पराभवांची मालिका खंडित करत दुसरा विजय मिळवला आहे.

आजच्या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार ओईन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय कोलकात्याच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला निर्धारित 20 षटकात केवळ 123 धावा जमवता आल्या. पंजाबकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 31 तर ख्रिस जॉर्डनने 30 धावांची खेळी केली. तर कोकलात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने 3 तर पॅट कमिन्स, सुनील नारायण या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

123 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या. कोलकात्याची सुरुवात वाईट झाली. कोलकात्याने तीन षटकात 17 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर कर्णधार ओईन मॉर्गनने आणि राहुल त्रिपाठीने सावधपणे फटकेबाजी करत संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. अखेर मॉर्गनने कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून ओईन मॉर्गनने सर्वाधिक 47 धावांची नाबाद खेळी केली. त्याला राहुल त्रिपाठीने 41 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Apr 2021 11:11 PM (IST)

    दिनेश कार्तिकचे चौकार, कोलकात्याचा विजय

    17 व्या षटकात दिनेश कार्तिकने दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावत कोलकात्याला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला आहे.

  • 26 Apr 2021 10:53 PM (IST)

    कोलकात्याला पाचवा झटका, आंद्रे रसल 10 धावांवर बाद

    कोलकात्याने पाचवी विकेट गमावली आहे. 10 धावांवर आंद्रे रसल धावबाद झाला आहे. अर्शदीप सिंहने रसलला धावबाद केलं. (कोलकाता 14.1 षटकात 98/5)

  • 26 Apr 2021 10:34 PM (IST)

    कोलकात्याला चौथा झटका, राहुल त्रिपाठी 41 धावांवर बाद

    राहुल त्रिपाठीच्या रुपात कोलकात्याने चौथी विकेट गमावली आहे. दीपक हुडाच्या गोलंदाजीवर शाहरुख खानने एक शानदार झेल पकडत राहुल त्रिपाठीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (कोलकाता 83/4)

  • 26 Apr 2021 10:22 PM (IST)

    राहुल त्रिपाठी-ओईन मॉर्गनची अर्धशतकी भागीदारी, कोलकाता सुस्थितीत

    17 धावांवर 3 विकेट गमावल्यानंर कोलकात्यासाठी राहुल त्रिपाठी (28) आणि कर्णधार ओईन मॉर्गनने (24) महत्त्वाची भागीदारी रचली आहे. दोघांनी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी रचत या सामन्यातील कोलकात्याचे आव्हान जिवंत ठेवलं आहे. (9 षटकात कोलकाताची 67 धावांपर्यंत मज)

  • 26 Apr 2021 10:15 PM (IST)

    राहुल त्रिपाठी-ओईन मॉर्गनची सावध खेळी, कोलकात्याची 3 बाद 51 धावांपर्यंत मजल

    राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ओईन मॉर्गनने सावधपणे धावफलक हलता ठेवत धावफलकावर संघाचं अर्धशतक झळकावलं आहे. आठव्या षटकात राहुल त्रिपाठीने ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावत गियर बदलला आहे.

  • 26 Apr 2021 09:50 PM (IST)

    कोलकात्याचा तिसरा झटका, सुनील नारायण बाद

    कोलकात्याचा तिसरा झटका, सुनील नारायण बाद, अर्शदीप सिंगच्या बोलिंगवर उंच फटका मारण्याच्या नादात सुनील झेलबाद, रवी बिश्नोई याने त्याचा झेल अचूकपणे टिपला

  • 26 Apr 2021 09:43 PM (IST)

    कोलकात्याला दुसरा झटका, नितीश राणा बाद

    कोलकात्याला दुसरा झटका, नितीश राणा बाद, नितीश पहिल्याच चेंडूत झेलबाद झाला, त्याआधी शुभमन गील हा मोहम्मद शमीच्या चेंडूवर पायचित, शुभमन याने 8 चेंडूत 9 धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर आलेला शुभमन हा झेलबाद झाला

  • 26 Apr 2021 09:14 PM (IST)

    पंजाबचा नववा फलंदाज बाद, ख्रिस जॉर्डन 30 धावांवर बाद

    ख्रिस जॉर्डनच्या रुपात पंजाबने नववी विकेट गमावली आहे. प्रसिद्ध कृष्णाने जॉर्डनला त्रिफळाचित केलं.

  • 26 Apr 2021 09:12 PM (IST)

    जॉर्डनचा तिसरा षटकार

    ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर अजून एक शानदार षटकार लगावला.

  • 26 Apr 2021 09:11 PM (IST)

    जॉर्डनचा दुसरा षटकार

    ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावला.

  • 26 Apr 2021 09:09 PM (IST)

    ख्रिस जॉर्डनची फटकेबाजी

    19 व्या षटकात ख्रिस जॉर्डनने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि एक षटकार फटकावत पंजाबला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे.

  • 26 Apr 2021 09:06 PM (IST)

    98 धावांवर पंजाबचा आठवा फलंदाज बाद, रवी बिश्नोई बाद

    98 धावांवर पंजाबचा आठवा फलंदाज बाद झाला आहे, रवी बिश्नोई अवघी एक धाव करुन बाद झाला. पॅट कमिन्सचं दुसरं यश.

  • 26 Apr 2021 09:02 PM (IST)

    पंजाबचा सातवा फलंदाज बाद, शाहरुख खान 13 धावांवर बाद

    पंजाबचा सातवा फलंदाज माघारी परतला आहे. शाहरुख खान 13 धावांवर बाद. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर ओईन मॉर्गनने शानदार झेल घेत शाहरुखला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (पंजाब 95/7)

  • 26 Apr 2021 08:46 PM (IST)

    पंजाबचा सहावा फलंदाज बाद, निकोलस पूरन 19 धावांवर बाद

    पंजाबचा सहावा फलंदाज बाद झाला आहे. निकोलस पूरन 19 धावांवर बाद. वरुण चक्रवर्तीने पूरनला त्रिफळाचित केलं. (पंजाब 79/6)

  • 26 Apr 2021 08:41 PM (IST)

    पंजाबचा पाचवा फलंदाज माघारी, मोजेस ऑनरिकेज 2 धावांवर बाद

    पंजाबचा पाचवा फलंदाज माघारी परतला आहे. मोजेस ऑनरिकेज (Moises Henriques) 2 धावांवर बाद. सुनील नारायणचं दुसरं यश (पंजाब 75/5)

  • 26 Apr 2021 08:37 PM (IST)

    निकोलस पूरनचा पहिला षटकार

    वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सामन्यातील 13 व्या षटकात निकोलस पूरनने शानदार षटकार फटकावला.

  • 26 Apr 2021 08:32 PM (IST)

    पंजाबला चौथा झटका, मयंक अग्रवाल 31 धावांवर बाद

    पंजाब किंग्सचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे. फिरकीपटू सुनील नारायणच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने उत्कृष्ट झेल घेत मयंक अग्रवालला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  • 26 Apr 2021 08:14 PM (IST)

    पंजाबला तिसरा झटका, दीपक हुडा माघारी परतला

    पंजाब किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर ओईन मॉर्गनने शानदार कॅच पकडत दीपक हुडाला माघारा पाठवलं आहे. (पंजाब 42/3)

  • 26 Apr 2021 08:06 PM (IST)

    पंजाबचा दुसरा फलंदाज माघारी, ख्रिस गेल शून्यावर बाद

    पंजाबचा दुसरा फलंदाज माघारी, शिवम मावीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने झेल घेत ख्रिस गेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  • 26 Apr 2021 08:00 PM (IST)

    पंजाबला पहिला झटका, के. एल. राहुल 19 धावांवर बाद

    पंजाब किंग्सला पहिला झटका बसला आहे. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर के. एल. राहुल बाद झाला. सुनील नारायणने उत्कृष्ट झेल पकडत राहुलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (पंजाब 5.4 षटकात 1 बाद 36)

  • 26 Apr 2021 07:39 PM (IST)

    मयंक अग्रवालचा षटकार

    सामन्यातील दुसऱ्याच षटकात पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवालने शानदार षटकार फटकावला.

  • 26 Apr 2021 07:38 PM (IST)

    पंजाबचे सलामीवीर मैदानात

    नाणेफेक जिंकून कोलकात्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यमुळे पंजाबचे सलामीवीर (के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल) मैदानात दाखल झाले आहेत.

  • 26 Apr 2021 07:04 PM (IST)

    नाणेफेक जिंकून कोलकात्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

    नाणेफेक जिंकून कोलकात्याचा कर्णधार Eoin Morgan ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 26 Apr 2021 06:42 PM (IST)

    कोलकात्याचं पारडं जड

    कोलकाता आणि पंजाबचे संघ या आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 पैकी 18 सामने कोलकात्याने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये पंजाबला विजय मिळवता आला आहे.

Published On - Apr 26,2021 11:11 PM

Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.