AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली करियरमधील सर्वात मोठी संधी, टीम इंडियात निवड

Rahul Dravid : बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने भारतीय टीमची निवड केली आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांचा मुलगा समितची टीम इंडियात निवड झाली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या टी20 लीगमध्ये समित द्रविड खेळताना दिसलेला. तो विशेष चमकदार कामगिरी करु शकला नव्हता.

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली करियरमधील सर्वात मोठी संधी, टीम इंडियात निवड
Samit DravidImage Credit source: Maharaja T20 Trophy
| Updated on: Aug 31, 2024 | 12:25 PM
Share

फक्त भारतातीलच नाही, तर जगातील महान फलंदाजांमध्ये राहुल द्रविड यांची गणना होते. सॉलिड टेक्निक आणि संकटमोचक इनिंग्समुळे त्यांना ‘द वॉल’ची उपाधी मिळाली. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सुद्धा क्रिकेटपटू आहे. फॅन्सना त्याच्याकडूनही भरपूर अपेक्षा आहेत. समित नुकताच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून आयोजित टी20 लीग महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये खेळला. या लीगममध्ये समित मैसूरू वॉरियर्स टीमचा भाग होता. या स्पर्धेत तो खास प्रदर्शन करु शकला नाही, पण त्याने आपल्यातल टॅलेंट दाखवून दिलं. आता समितच सिलेक्शन भारताच्या अंडर-19 टीममध्ये झालय. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होम सीरीजमध्ये समित द्रविडला संधी दिलीय. समित पहिल्यांदा भारताच्या अंडर 19 टीमचा भाग असेल.

बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीममध्ये वनडे आणि फोर डे सीरीजची घोषणा केली आहे. ही मालिका भारतातच खेळली जाणार आहे. 21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सीरीजमध्ये 3 वनडे आणि 2 फोर डे सामने आहेत. बीसीसीआयच्या जूनियर सिलेक्शन कमिटीने भारतीय टीमची निवड केली आहे. राहुल द्रविडचा मुलगा समितला दोन्ही सीरीजसाठी निवडण्यात आलं आहे. समित महाराजा ट्रॉफीमध्ये विशेष चमकदार कामगिरी करु शकला नाही. टुर्नामेंटमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या 33 होती. सततच्या अशा प्रदर्शनामुळे त्याला नंतर प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.

सीरीजच वेळापत्रक, कधी होणार सामने?

ऑस्ट्रेलियाची अंडर-19 टीम भारत दौऱ्यावर सर्वात आधी वनडे सीरीज खेळेल. पहिला सामना 21 सप्टेंबर, दुसरा 23 आणि तिसरा सामना 26 सप्टेंबरला होईल. फोर डे सीरीजचा पहिला सामना 30 सप्टेंबरला सुरु होईल. दुसरा सामना 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होईल. वनडे सीरीज पुड्डचेरी येथे तर फोर डे सीरीज चेन्नईमध्ये होईल.

वनडे सीरीजसाठी भारताचा स्क्वॉड

मोहम्मद अमान (कॅप्टन), रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युधाजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद एनान.

फोर डे सीरीजसाठी भारताचा स्क्वॉड

सोहम पटवर्धन (कॅप्टन), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह पंगालिया, चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंह, आदित्य सिंह, मोहम्मद एनान

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.