IND vs SA T 20 Series: करीयरमधली महत्त्वाची ‘ती’ 20 मिनिटं, राहुल द्रविड यांनी घेतला Umran Malik चा क्लास

IND vs SA T 20 Series: भारतीय संघाने कालपासून सराव सुरु केलाय. भारताकडून अनेक युवा खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा चेहऱ्यांना निवड समितीने संधी दिली आहे.

IND vs SA T 20 Series: करीयरमधली महत्त्वाची 'ती' 20 मिनिटं, राहुल द्रविड यांनी घेतला Umran Malik चा क्लास
Rahul Dravid-Umran MalikImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 11:41 AM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) येत्या 9 जूनपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर पहिली लढत होणार आहे. भारतीय संघाने कालपासून सराव सुरु केलाय. भारताकडून अनेक युवा खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा चेहऱ्यांना निवड समितीने संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा सारख्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. काल नेट्समध्ये उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या खेळाडूंनी जोरदार सराव केला. युवा उमरान मलिकची (Umaran Malik) तर आयपीएलपासून चर्चा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने खूप वेगवान चेंडू टाकले. सध्याच्या घडीला भारतातीत तो सर्वात वेगवान गोलंदाज आहे. काल नेट्समध्ये भारताचे हेड कोच राहुल द्रविड यांनी उमरान मलिकशी संवाद साधला. जवळपास 20 मिनिट त्यांनी उमरान मलिकशी चर्चा केली. त्याचा मास्टर क्लास घेतला. त्याला महत्त्वाच्या टीप्स देताना ते दिसले. उमरान मलिकशी बोलत असताना, ते सतत हाताने विकेटकडे निर्देश करत होते.

पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव

राहुल द्रविड बोलत असताना, उमरान मलिक शांतपणे एकाग्रतेने ते सर्व ऐकत होता. शक्य असले तितक्या वेगात गोलंदाजी कर, असा भारतीय टीम मॅनेजमेंटकडून उमरान मलिकला स्पष्ट संदेश आहे. भारतीय संघासाठी दीर्घकाळ डोळ्यासमोर ठेऊन उमरान मलिकला तयार करण्याची द्रविड यांची रणनिती आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये उमरान मलिकने 157 किलोमीटर प्रतितास वेगाने त्याने गोलंदाजी केली. नेट्स मध्ये उमरानने भारताचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. संपूर्ण नेट सेशन दरम्यान राहुल द्रविड काही नोट्स बनवत होते.

उमरानच्या वेगाची पाकिस्तानात चर्चा

आयपीएलमध्ये उमरान मलिक सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. उमरान मलिक मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. उमरान मलिकवर ज्या पद्धतीची मेहनत घेतली जातेय, त्यावरुन त्याला पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमरान मलिकच्या वेगाची पाकिस्तानातही चर्चा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.