GT vs PBKS IPL 2022: तेवतियाची मैदानातच सटकली, सुदर्शनवर चिडला, VIDEO, पंजाब किंग्सला 144 रन्सचं टार्गेट

GT vs PBKS IPL 2022: तेवतिया सोबत सुदर्शन खेळपट्टीवर होता. तो दुसऱ्याबाजूने डावाला आकार देत होता. तेवतिया तसा शांत असतो. पण धावगती वाढवण्याचा दबाव त्याच्यावर दिसला.

GT vs PBKS IPL 2022: तेवतियाची मैदानातच सटकली, सुदर्शनवर चिडला, VIDEO, पंजाब किंग्सला 144 रन्सचं टार्गेट
Rahul TewtiaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:37 PM

मुंबई: पॉइंटस टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये (GT vs PBKS) सामना सुरु आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही मॅच होत आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना आज अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गुजरातचा संघ आज नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसला नाही. शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि वृद्धीमान सहा हे दोन्ही सलामीवीर पावरप्लेच्या आतच बाद झाले. हार्दिक पंड्याही (Hardik pandya) आज काही विशेष करु शकला नाही. सात चेंडूत अवघी एक धाव करुन तो तंबूत परतला. साई सुदर्शन आणि डेविड मिलरने आज गुजरातला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण मिलर लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर बाद झाला. त्याने फक्त 11 रन्स केल्या. आज पुन्हा एकदा राहुत तेवतियावर संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी होती.

सुदर्शनकडून प्रतिसाद मिळाला नाही

तेवतिया सोबत सुदर्शन खेळपट्टीवर होता. तो दुसऱ्याबाजूने डावाला आकार देत होता. तेवतिया तसा शांत असतो. पण धावगती वाढवण्याचा दबाव त्याच्यावर दिसला. राहुल तेवतिया आज रनआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. त्यावेळी तो सहकारी सुदर्शनवर चिडला. गुजरातच्या डावात 12 व्या षटकात ही घटना घडली. तेवतियाने एकेरी धाव पळण्याचा प्रयत्न केला. तो खेळपट्टीच्या मध्यापर्यंत आला होता. पण त्याला दुसऱ्याटोकाकडून सुदर्शनकडून प्रतिसाद मिळाला नाही. तेवतियाची विकेटच गेली असती, पण थोडक्यात तो वाचला. राहुलला हे पटलं नाही, तो सुदर्शनवर मैदानातच चिडला.

पंजाब किंग्सला 144 धावांचे टार्गेट

दरम्यान गुजरात टायटन्सने निर्धारीत 20 षटकात आठ बाद 143 धावा केल्या आहेत. शुभमन गिल (9) वृद्धीमान सहा (21) आणि हार्दिक पंड्या (1) लवकर बाद झाले. नेहमी संकटमोचक ठरणारे राहुल तेवतिया (11) आणि डेविड मिलरही (11) लवकर बाद झाले. राशिद खानला भोपळाही फोडता आला नाही. गुजरात टायटन्सकडून आज साई सुदर्शनने एकबाजू लावून धरली. त्याने 50 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.