AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs GT IPL 2022: अविश्वसनीय! शुभमन गिल तरी काय करणार? राहुलने कव्हर्समध्ये घेतलेला फ्लाईंग कॅच एकदा पहाच VIDEO

SRH vs GT IPL 2022: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेदरम्यान अनेक क्षेत्ररक्षकांकडून मैदानावर चूका होताना दिसतायत. क्षेत्ररक्षणादरम्यान मिस फिल्ड होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

SRH vs GT IPL 2022: अविश्वसनीय! शुभमन गिल तरी काय करणार? राहुलने कव्हर्समध्ये घेतलेला फ्लाईंग कॅच एकदा पहाच VIDEO
राहुल त्रिपाठीने घेतला शुभमन गिलचा जबरदस्त झेल Image Credit source: twitter
| Updated on: Apr 11, 2022 | 8:51 PM
Share

मुंबई: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेदरम्यान अनेक क्षेत्ररक्षकांकडून मैदानावर चूका होताना दिसतायत. क्षेत्ररक्षणादरम्यान मिस फिल्ड होण्याचं प्रमाण वाढलं आहे. झेल सुटताना पहायला मिळतायत. मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकांकडून होणाऱ्या या चूका संघाला महाग पडतायत. काल लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow super giants) कृणाल पंड्याने हेटमायरचा असाच कॅच सोडला. ज्याची किंमत टीमला चुकवावी लागली. कारण मिळालेल्या जीवदानाचा लाभ उचलताना हेटमायरने नंतर अर्धशतकी खेळी केली. क्षेत्ररक्षक मैदानावर चूका करतायत, पण काही फिल्डर्स अप्रतिम कामगिरी सुद्धा करत आहेत. आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) दरम्यानच्या सामन्यावेळी अशीच उत्तम फिल्डिंग पहायला मिळाली. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये हा जबरदस्त झेल पहायला मिळाला.

डावाच्या सुरुवातीलाच मिळाली मोठी विकेट

सध्या गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने सलग दोन सामन्यात दोन मॅचविनिंग अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. हा इनफॉर्म प्लेयर आज फक्त जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे आऊट झाला. भुवनेश्नवर कुमार तिसरं षटक टाकत होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शुभमनने कव्हर्सच्या दिशेने चांगला फटका मारला. पण तिथे तैनात असलेल्या राहुल त्रिपाठीने हवेत सूर मारुन गिलचा सुंदर झेल टिपला. हैदराबादला डावाच्या सुरुवातीलाच शुभमन गिलसारखी मोठी विकेट मिळाली.

ते दोन सिक्स ठरले निर्णायक

शुभमन गिलने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 84 आणि पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 59 चेंडूत 96 धावांची खेळी केली होती. पंजाब विरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकून शुभमन गिलच्या खेळीचा मान ठेवला होता. त्या दोन षटकारांमुळे गुजरातला विजयाची हॅट्ट्रिक करता आली.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.