क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन

संपूर्ण भारतात कोरोनाचा हैदोस सुरु असताना क्रिकेट विश्वालाही कोरोनाने हादरा दिलाय. राजस्थानचा माजी लेगस्पिनर आणि रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव (Vivek Yadav) या उमद्या खेळाडूला कोरोनाने हिरावून नेलंय. (Rajasthan Ranaji Cricketer Vivek yadav Pass Away Due To Covid 19)

क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन
राजस्थानचा माजी लेगस्पिनर विवेक यादव (Vivek Yadav) या उमद्या खेळाडूला कोरोनाने हिरावून नेलंय.
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 8:00 AM

जयपूर : संपूर्ण भारतात कोरोनाचा हैदोस सुरु असताना क्रिकेट विश्वालाही कोरोनाने हादरा दिलाय. राजस्थानचा माजी लेगस्पिनर आणि रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव (Vivek Yadav) या उमद्या खेळाडूला कोरोनाने हिरावून नेलंय. 36 वर्षी विवेक यादव कोरोनाशी दोन हात करत होता परंतु त्याच्या लढाईला यश आलं नाही. कोरोनाविरुद्धची मॅच अखेर त्याने हरली. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. (Rajasthan Ranaji Cricketer Vivek yadav Pass Away Due To Covid 19)

जयपूरच्या रुग्णालयात अखेरचा श्वास

विवेक यादवने जयपूरच्या एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विवेकला करोनाआधी कॅन्सरने गाठलं होतं. कॅन्सरच्या उपचारासाठी तो रुग्णालयात गेला असता तसंच किमोथेरपी करण्याअगोदर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीत तो कोरोनाने बाधित आढळला.

कोरोनाने उमदा खेळाडू हिरावून नेला…!

ज्यानंतर त्याला रुग्णालयात भरती केलं गेलं. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडत गेली. तो उपचारांना योग्य प्रतिसाद देत नव्हता. अखेर कोरोनाविरुद्धची त्याची झुंज अपयशी ठरली. कोरोनाने एक उमदा खेळाडू हिरावून नेला.

माझा जवळचा मित्र गेला…!

भारताचा माजी सलामीवार आणि आघाडीचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने ट्विट करुन विवेकच्या दु:खद निधनाची माहिती दिली आहे. “राजस्थानचा रणजी खेळाडू आणि माझा जवळचा मित्र…. विवेक या जगात आता राहिला नाही. देवाने त्याच्या आत्म्यास शांती देवो, माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत”, असं आकाश चोप्राने ट्विटमध्ये म्हटलंय.

विवेक यादवची क्रिकेट कारकीर्द

विवेक यादवने खेळलेल्या 18 फर्स्ट क्लास सामन्यांत त्याने 57 विकेट मिळवल्या. 2010-2011 मध्ये त्याने रणजी करंडकातील अंतिम सामना खेळला, जो त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील महत्वाचा सामना होता.

अंतिम सामन्यात बडोद्याविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 91 धावा देऊन महत्त्वपूर्म चार बळी मिळवले आणि राजस्थानला पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विवेकने वयाच्या 30 व्या वर्षी त्याचा शेवटचा सामना खेळला होता.

(Rajasthan Ranaji Cricketer Vivek yadav Pass Away Due To Covid 19)

हे ही वाचा :

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, ‘भारत असा देश….’

‘ओ हसीना बडी सुंदर सुंदर’, बायकोच्या वाढदिवशी जसप्रीतकडून रोमँटिक फोटो शेअर करत खास मेसेज!

PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.