IPL 2023 : खरंच Yashasvi jaiswal ने सेंच्युरी झळकवावी अशी Sanju Samon ची इच्छा होती का? म्हणून हेतूबद्दल शंका
IPL 2023 : यशस्वी जैस्वालला सेंच्युरीसाठी अवघ्या 2 धावा कमी पडल्या. संजू सॅमसनकडून अशी अपेक्षा नव्हती. राजस्थानने जबरदस्त सुरुवात केली. 10 ओव्हर्समध्येच राजस्थानच्या 1 बाद 107 धावा झाल्या होत्या.
कोलकाता : यशस्वी जैस्वालने आयपीएल इतिहासातील वेगवान हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने फक्त 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएलचा 56 वा सामना झाला. जैस्वालच्या शतकाला अवघ्या 2 धावा कमी पडल्या. तो आरामात आपलं शतक पूर्ण करु शकला असता. पण सेंच्युरी झळकवू शकला नाही. जैस्वालच्या चौकाराने राजस्थानचा विजय निश्चित केला. पण तो स्वत:च शतक पूर्ण करु शकला नाही.
संजू सॅमसनही त्याचमुळे आपलं अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. तो चौकार मारुन अर्धशतक झळकवू शकला असता. पण संजूने चौकार मारला नाही. त्याने जैस्वालला स्ट्राइकवर येण्याची संधी दिली. त्याने यशस्वीला सिक्स मारायला सांगितला.
खरंच सॅमसनने अशी कुर्बानी दिली?
संजूने जैस्वालसाठी आपल्या हाफ सेंच्युरीची कुर्बानी दिली. पण खरंच सॅमसनने अशी कुर्बानी दिली? की त्याच्यामुळेच जैस्वालच शतक पूर्ण होऊ शकलं नाही. कोलकाताने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 150 धावांच टार्गेट दिलं. राजस्थानने जबरदस्त सुरुवात केली. 10 ओव्हर्समध्येच राजस्थानच्या 1 बाद 107 धावा झाल्या होत्या.
सॅमसन वेग कमी करु शकला असता
जैस्वाल 36 चेंडूत 82 धावांवर खेळत होता. सॅमसन 21 चेंडूत 21 धावांवर होता. राजस्थानला विजयासाठी 60 चेंडूत 43 धावांची आवश्यकता होती. जैस्वालची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. अनुकूल रॉयच्या ओव्हरमध्ये सॅमसनने 3 सिक्स मारले. त्यानंतर राजस्थानला विजयासाठी 54 चेंडूत 23 धावांची गरज होती. जैस्वाल आपल्या शतकापासून 17 धावा लांब होता. सॅमसनच्या तीन सिक्समुळे जैस्वाल त्याच्या शतकापासून थोडा लांब गेला. खरंतर सॅमसनला जैस्वालच्या शतकासाठी आपल्या खेळाची गती कमी करता आली असती.
जैस्वालला संधी दिली, पण….
12.5 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक विकेटवर 147 धावा झाल्या होत्या. विजयासाठी त्यांना 42 चेंडूत 3 धावांची गरज होती. सॅमसन आपल्या फिफ्टीपासून 2 आणि जैस्वाल सेंच्युरीपासून 6 धावा दूर होता. एक सिक्समुळे जैस्वालची सेंच्युरी झाली असती. सॅमसनने पुढच्या चेंडूवर सिंगला घेतला नाही. तो फोर मारुन हाफ सेंच्युरी पूर्ण करु शकला असता. पण त्याने असं केलं नाही. जैस्वाल पुढच्याच ओव्हरमध्ये स्ट्राइकवर आला. त्यावेळी सॅमसनने त्याला सिक्स मारायला सांगितलं. जैस्वालला शतकासाठी 6 धावांची गरज होती. पण चौकार मारुन तो 98 रन्सवर पोहोचला. मॅचनंतर फॅन्सची दोन गटात विभागणी
या मॅचनंतर क्रिकेट फॅन्सची दोन भागात विभागणी झाली आहे. काहींच्या मते, जैस्वालच्या सेंच्युरीसाठी संजूने आपल्या हाफ सेंच्युरीच बलिदान दिलं. दुसऱ्या गटाला वाटतं, सॅमसनला माहित होतं, जैस्वाल त्याच्या शतकाच्या जवळ आहे, अशावेळी एक ओव्हरमध्ये तीन सिक्स मारण्याची गरज नव्हती. त्याने यशस्वीला धावा करण्याची संधी द्यायला पाहिजे होती.