सामन्याच्या मध्यात राजस्थान रॉयल्सचा असा निर्णय, आता रियान परागच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
आयपीएल 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभवाच्या छायेखाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला अवघ्या 151 धावांचं आव्हान दिलं आहे. हे सोपं आव्हान कोलकाता नाईट रायडर्स सहज गाठेल असं दिसत आहे. या सामन्यात रियान परागच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादने पहिल्याच सामन्यात 44 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकचं मोठं आव्हान घेऊन राजस्थान रॉयल्स मैदानात उतरली होती. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने राजस्थान रॉयल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण फलंदाजी वेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने मोठी चूक केली. त्याचा फटका काही अंशी संघाला बसला. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. मात्र कर्णधारपदाची छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. खरं तर कोलकात्याविरुद्धचा सामना गुवाहाटीत होत आहे आणि रियान परागचं होमग्राउंड आहे. पण असं असूनही या सामन्यात नको ती चूक करून बसला.
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली. तशी सुरुवात चांगली झाली होती. पण त्याची लय कायम ठेवता आली नाही. राजस्थानची पहिली विकेट संजू सॅमसनच्या रुपाने 33 धावांवर पडली. त्यानंतर दुसरी विकेट 67 धावांवर पडली. संजू सॅमसन दुसऱ्या डावात मैदानात उतरणार नाही हे निश्चित होतं. त्याच्याऐवजी गोलंदाजाला मैदानात उतरवतील हे अपेक्षित होतं. पण राजस्थानच्या विकेट धडाधड पडू लागल्या. धावांची गती मंदावल्याने राजस्थानला फलंदाजीला इम्पॅक्ट प्लेयर उतरवण्याचा निर्णय घेतला. शुभम दुबेला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. शुभम दुबे काही प्रभाव पाडू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 9 धावा केल्या आणि बाद झाला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा