LSG vs RCB IPL 2022: Rajat Patidar ने LSG च्या गोलंदाजांना कुट, कुट, कुटलं, 12 फोर, 7 सिक्स, पहा स्फोटक बॅटिंगचा VIDEO

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal challengers Banglore) फलंदाज रजत पाटीदारने (Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super giants) विरुद्ध शानदार शतक झळकावलं.

LSG vs RCB IPL 2022: Rajat Patidar ने LSG च्या गोलंदाजांना कुट, कुट,  कुटलं, 12 फोर, 7 सिक्स, पहा स्फोटक बॅटिंगचा VIDEO
RCB Rajat patidar Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 10:37 PM

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal challengers Banglore) फलंदाज रजत पाटीदारने (Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super giants) विरुद्ध शानदार शतक झळकावलं. एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. त्याने लखनौच्या गोलंदाजांनी जोरदार धुलाई केली. अक्षरक्ष: त्याने आणि दिनेश कार्तिकने लखनौच्या गोलंदाजांना कुट, कुट, कुटलं. दोघांनी इडन गार्डन्सवर आज चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रजत पाटीदारने 49 चेंडूत आयपीएल आणि टी 20 करीयरमधील पहिलं शतक झळकावलं. रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर RCB ने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये चार बाद 207 धावा केल्या. रजत पाटीदारने 54 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 7 सिक्स होते. दिनेश कार्तिकने आपल्या नेहमीच्या स्टाइलनमध्ये 23 चेंडूत 37 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली.

1,6,4,6,4, 6 रवी बिश्नोईला रजत पाटीदारने कसं धुतलं ते इथे क्लिक करुन बघा

आधी वाट पाहिली नंतर हल्लाबोल

इडन गार्डन्सवर टॉस हरल्यानंतर आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्याच षटकात त्यांनी कॅप्टन फाफ डू प्लेसिसला गमावलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याच ओव्हरमध्ये रजत पाटीदार फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने काही षटक वाट पाहिली. त्यानंतर जोरदार हल्लाबोल केला. पाटीदारने कृणाल पंड्या टाकत असलेल्या सहाव्या षटकात 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. विराट कोहली 25 धावांवर आऊट झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर मोहसीन खानकडे त्याने झेल दिला. ग्लेन मॅक्सवेल फारवेळ खेळपट्टीवर टिकला नाही. तो 9 धावांवर आऊट झाला.

12 फोर, 7 सिक्स रजत पाटीदारची पॉवर हिटिंग इनिंग इथे क्लिक करुन बघा

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

दिनेश कार्तिकची क्लासिक बॅटिंग

दिनेश कार्तिक आणि पाटीदारची जोडी जमल्यानंतर लखनौचे गोलंदाज हतबल झाले. दोघांनी दुर्तफा हल्ला चढवला. दिनेश कार्तिकने कुठेही धावगती मंद होऊ दिली नाही. त्याने 23 चेंडूत 37 धावा चोपल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.