Ramesh Powar | दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी

बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Ramesh Powar |  दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी
BCCI
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 7:59 PM

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमला (Indian Womens Cricket team) नवा प्रशिक्षक मिळाला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार (Ramesh Powar) यांची महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पोवारांनी अनेक दिग्गजांना पछाडत बाजी मारली आहे. पोवार डब्ल्यूव्ही रमन यांची जागा घेणार आहेत. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी 13 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्ज दाखल केले होते. मात्र सर्व प्रक्रियेनंतर पोवार सरस ठरले आहे. (Ramesh Powar appointed Head Coach of Indian Womens Cricket team)

एकूण 35 जण इच्छूक

महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण 35 जणांनी अर्ज केले होते. त्यातून 8 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या 8 जणांची मुलाखत ही (Cricket Advisory Committee) बीसीसीआयच्या सल्लागार समितीने घेतली. या समितीमध्ये मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंगचा समावेश होतेा. मात्र या 8 जणांना पोवार पुरुन उरले. अखेर सल्लागार समितीने पोवार यांची प्रशिक्षक पदासाठी नाव अंतिम केलं.

पोवारांची प्रशिक्षक म्हणून दुसरी वेळ

प्रशिक्षक म्हणून पोवारांची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी याआधी जुलै-नोव्हेंबर 2018 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलंय. पोवारांच्या प्रशिक्षणाखाली महिला टीमने 2018 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. पृथ्वी शॉने त्याच्या नेतृत्वात मुंबईला विजय हजारे करंडक मिळवून दिला होता. यावेळेस पोवार हे मुंबई टीमचे प्रशिक्षक होते.

रमेश पोवारांची क्रिकेट कारकिर्द

रमेश पोवारांनी 31 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्यांनी कसोटीत 6 तर वनडेत 34 विकेट्स मिळवल्या आहेत. यासह त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 148 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 470 विकेट्स पटकावल्या आहे. सोबत 4 हजार 245 धावाही केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणाकडे दौरा वळवला.

संबंधित बातम्या :

ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी

भारताकडून काहीतरी शिका, मोहम्मद आमीरची पाकिस्तान सोडण्याची तयारी, ‘या’ देशाचं नागरिकत्व स्वीकारणार

(Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.