Ramiz Raja : पाकिस्तानची भारताला थेट धमकी! ‘जर असे झाले तर आमच्याशिवाय खेळा विश्वकप’
Ramiz Raja : पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डावा सुरु केला आहे..
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी पुन्हा एकदा वायफळ बडबड केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या एका विधानाला उत्तर दिले. त्यानुसार, जर भारतीय संघ आशिया कपासाठी पाकिस्तानात दाखल झाला नाही तर ते आगामी विश्वचषकासाठी (World Cup) त्यांचा संघ भारतात येणार नाही.
पाकिस्तानच्या संघाविनाच विश्वकप खेळावा लागेल, असा भारताला त्यांनी धमकी दिली. त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्यांच्या या वक्तव्याला बीसीसीआय काय उत्तर देते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान राजकीय तणावामुळे 2012 पासून दोन्ही संघात कोणतीही मालिका खेळविण्यात आलेली नाही. एवढंच नाही तर भारतीय क्रिकेट संघाने जवळपास 14 वर्षांपासून पाकिस्तानी भूमीवर पाऊल ठेवलेले नाही.
भारतीय संघ 2008 साली पाकिस्तानात आशिया कप खेळला होता. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानात पाय ठेवलेला नाही. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि दोन्ही देशांमधील ताणल्या गेलेले संबंध हे यामागील सर्वात मोठे कारण आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नेतृ्त्वात पुढील वर्षी आशिया कपाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर भारतीय संघ, पाकिस्तानात अजिबात खेळणार नाही, असा निर्णय जय शाह यांनी जाहीर केला. त्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला.
जय शाह यांच्या निर्णयाला पाकिस्तान क्रिकेट संघाने हैराण करणारे उत्तर दिले. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, रमीज राजा यांनी शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात आला नाही तर, त्यांना पाकिस्तानशिवाय विश्वकप खेळावा लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांचा सामना हा संपूर्ण क्रिकेट जगातासाठी खास मेजवाणीच असतो. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. टी-20 विश्वकप 2022 मध्ये दोन्ही संघ भिडले होते. भारताने पाकिस्तानचा या सामन्यात 4 गडी राखून पराभव झाला.
पाकिस्तानची टी-20 विश्वकप 2022 मधील खेळी अत्यंत निराशाजनक होती. संघाची कामगिरी हाराकिरीची होती. तरीही ही पाकिस्तानी संघ अंतिम सामन्यापर्यंत धडकला होता. या सामन्यात त्याला इंग्लंडकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.