Cricket : उमरान मलिकचं कमबॅक, रोहित शर्माचाही समावेश, संघाची घोषणा

Cricket : आगामी महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड समितीने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या 15 सदस्यीय संघामध्ये रोहित शर्मा याचाही समावेश आहे.

Cricket : उमरान मलिकचं कमबॅक, रोहित शर्माचाही समावेश, संघाची घोषणा
umran malik team indiaImage Credit source: umran malik x account
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 8:42 PM

भारतात सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा थरार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच इंडिया ए संघाने दुलीप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता 11 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जम्मू आणि काश्मिरने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचा समावेश करण्यात आला आहे. उमरान गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीसह लढत होता. मात्र आता उमरान पूर्णपणे फिट झाला आहे. उमरान रणजी ट्रॉफी स्पर्धेत बॉलिंगने धमाका करण्यासाठी तयार झाला आहे.

उमरानला आयपीएलच्या सतराव्या हंगामानंतर दुखापत झाली होती. त्यानंतर उमरानची दुलीप ट्रॉफी स्पर्धेत निवडकरण्याच आली होती. मात्र उमरानला आजारामुळे या स्पर्धेला मुकावं लागलं होतं. अशात आता उमरान रणजी ट्रॉफीत धुमाकूळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. उमरान रणजी ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी करुन टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. उमरानने गेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामात सहभाग घेतला होता. उमरानने या स्पर्धेत अखेरचा फर्स्ट क्लास सामना खेळला होता. उमरानने आतापर्यंत 12 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

रसीख दार याची निवड

पारस डोगरा हा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील आगामी हंगामात जम्मू काश्मीरचं नेतृत्व करणार आहे. तर शुभम खजुरिया याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच रसीख दार यालाही संधी देण्यात आली आहे. रसीखने गेल्या 5 वर्षात एकही फर्स्ट क्लास सामना खेळलेला नाही. रसीख आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात होता. रसीखने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली होती. तसेच अब्दुल समद यालाही संधी मिळाली आहे.

jammu kashmir squad for ranji trophy

jammu kashmir squad for ranji trophy

रणजी ट्रॉफी 2024-25 साठी जम्मू-काश्मीर टीम : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजुरिया (उपकर्णधार), अहमद बंदे, अभिनव पुरी, विव्रान्त शर्मा, शुभम पुंडीर, अब्दुल समद, शिवांश शर्मा (विकेटकीपर), साहिल लोत्रा, आबिद मुश्ताक, उमरान मलिक, रोहित शर्मा, युद्धवीर सिंह, आकिब नबी आणि रसिख सलाम.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.