Rashid Khan ची कमाल, T20 मध्ये बनला किंग, वयाच्या 24 व्या वर्षी मोठा रेकॉर्ड
अफगाणिस्तानचा स्पिन बॉलर राशिद खानने टी 20 क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवलय. 24 वर्षाच्या या क्रिकेटपटूने टी 20 क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठलाय. टी 20 फॉर्मेटमध्ये अशी करामत करणारा तो जगातील पहिला स्पिन बॉलर आहे.
डरबन – अफगाणिस्तानचा स्पिन बॉलर राशिद खानने टी 20 क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवलय. 24 वर्षाच्या या क्रिकेटपटूने टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण केल्या आहेत. टी 20 फॉर्मेटमध्ये अशी करामत करणारा तो जगातील पहिला स्पिन बॉलर आहे. राशिदच्या आधी वेस्ट इंडिजचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होने टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण केले होते. ब्राव्हो अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान बॉलर होता. त्याने 526 सामन्यात हा टप्पा गाठला होता. तेच राशिदने 368 सामन्यात 500 विकेट मिळवल्या आहेत.
वयाच्या 24 व्या वर्षी कमाल
राशिद खान टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात 500 विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. वयाच्या 24 व्या वर्षी त्याने ही कमाल केलीय. राशिदमुळे अफगाणिस्तान क्रिकेट टीमला आंतरराष्ट्रीय स्तरावर बरच यश मिळालय.
राशिद कुठल्या लीग्समध्ये खेळतो?
राशिद खान केवळ अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा भाग नाहीय. तो जगातील वेगवेगळ्या टी 20 लीगमध्ये खेळत असतो. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याआधी सनरायजर्स हैदराबादसाठी खेळायचा. त्याशिवाय राशिद खान पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, दक्षिण आफ्रिका टी 20 लीग आणि कॅरेबियाई प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळतो.
कोण ठरला 500 वा विकेट?
राशिद खानने दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये आपले 500 विकेट पूर्ण केले. मुंबई इंडियन्स केपटाऊकडून खेळताना राशिदने प्रेटोरिया कॅपिटल्सच्या सिलडे फॉरच्यूनला एलबीडब्ल्यू बाद केलं. तो राशिदचा 500 वा विकेट ठरला.
राशिद कुठल्या टीमकडून खेळतोय?
दक्षिण आफ्रिकेतील याच SA20 लीगमध्ये 18 जानेवारी मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायजर्स ईस्टर्न कॅपमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये बदल्याचा खेळ पहायला मिळाला. सनरायजर्स ईस्टर्न कॅपने ही मॅच जिंकली. या मॅचमध्ये मार्को जॅनसेनने राशिद खानबरोबर जुना हिशोब चुकता केला.
राशिदच्या बॉलिंगवर हल्लाबोल
20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 171 धावा केल्या. सनरायजर्स ईस्टर्न कॅपसमोर विजयासाठी 172 धावांच टार्गेट होतं. सनरायजर्सने 3 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं. मार्को जॅनसेनच्या वादळी खेळीमुळे सनरायजर्सला हे लक्ष्य पार करता आलं. मुंबई इंडियन्स केपटाऊनचा बॉलर राशिद खानवर त्याने हल्लाबोल केला. राशिदच्या ओव्हरमध्ये 6,4,6,6,0,6 एकूण 28 धावा लुटल्या. जुना हिशोब चुकता केला
27 एप्रिल 2022 रोजी आयपीएल सामना झाला. राशिद खान गुजरात टायटन्सकडून खेळत होता. राशिद खानने या मॅचमध्ये SRH विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली होती. याच सामन्यात मार्को जॅनसेनच्या एका ओव्हरमध्ये राशिद खानने 25 धावा कुटल्या होत्या. तोच हिशोब जॅनसेनने इथे चुकवला.