करार संपल्यानंतर टीम इंडियाचे कोच काय करणार ? रवी शास्त्रींकडे ‘या’ खास ऑफर
अलीकडेच नव्याने आलेला अहमदाबाद हा आयपीएलचा संघ शास्त्री यांना मुख्य कोच म्हणून नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत भरतीय संघाला फलांदीचे प्रशिक्षण देणारे भरत अरुण तसेच गोलंदाजीचे प्रशिक्षण देणारे श्रीधर हेसुद्धा अहमदाबाद संघाशी जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली
मुंबई : टी-20 विश्वचषक संपल्यावर भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्री यांच्यानंतर माजी क्रिकेटपटू राहूल द्रवीड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर रवी शास्त्री नेमकं काय करणार ? कोणती भूमिका स्वीकारणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. दरम्यान, अलीकडेच नव्याने आलेला अहमदाबाद हा आयपीएलचा संघ शास्त्री यांना मुख्य कोच म्हणून नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाला फलंदाजीचे प्रशिक्षण देणारे भरत अरुण तसेच गोलंदाजीचे प्रशिक्षण देणारे श्रीधर हेसुद्धा अहमदाबाद संघाशी जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली केली जातेय.
समालोचक, आयपीएल टीमसाठी प्रशिक्षक होण्याची संधी
प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर रवी शास्त्री पुन्हा एकदा कॉमेंट्री करतानादेखील दिसू शकतात. क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर शास्त्री यांनी बरीच वर्षे समालोचन केलेले आहे. समालोचनाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. मात्र, 2016 साली भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शास्त्री यांनी समालोचन सोडून दिले होते. सध्या त्यांच्याकडे समालोचन किंवा आयपीलच्या टीमला प्रशिक्षण अशा दोन ऑफर्स असून यापैकी एक मार्ग ते स्वीकारू शकतात.
रवी शास्त्री यांच्याशी अनेकांनी केला संपर्क
रवी शास्त्री आयपीएलमध्ये कोचिंगची जबाबदारी सांभाळताना समालोचनाचे कामही करू शकतात. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मणही त्याच पद्धतीने सक्रिय आहे. तो सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक आहे. तसेच तो स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचनही करतो. अनेक प्रसारकांनी रवी शास्त्री यांच्याशी समालोचनासाठी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये स्टारसोबत सोनीचेही नाव आहे.
शास्त्री यांना टी-20 विश्वचषक संपण्याची प्रतीक्षा
दरम्यान, शास्त्री यांच्याकडे समालोचन आणि आयपीएल टीमसाठी प्रशिक्षण असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यांनी याबाबत अजूनतरी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार शास्त्री टी-20 विश्वचषक संपण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर ते याबाबत निर्णय घेतील. समालोचनाऐवजी ते आयपीएलच्या टीमला प्रशिक्षण देणे पसंद करतील असे सांगितले जात आहे.
इतर बातम्या :
VIDEO: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवलं गेलंय; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा दावा
VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
(ravi shastri may be appointed as coach of ahmedabad ipl team or can work as commentator)