AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravichandran Ashwin : ‘कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं’

टीम इंडिया(Team India)चा सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin)नं एका मुलाखतीत आपल्या करिअरशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी कुलदीप यादव(Kuldeep Yadav)चं कौतुक केलं

Ravichandran Ashwin : 'कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं'
रवी शास्त्री/आर. आश्विन
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 3:23 PM

टीम इंडिया(Team India)चा सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin)नं एका मुलाखतीत आपल्या करिअरशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी कुलदीप यादव(Kuldeep Yadav)चं कौतुक केलं आणि त्याला परदेशातला अव्वल फिरकीपटू म्हटलं. त्यानंतर मी पूर्णपणे कोलमडलो, असं आश्विन म्हणाला.

‘कुचंबणा होत होती’ एका मुलाखतीत आर आश्विननं अनेक खुलासे केलेत. तो म्हणाला, की मी रवी शास्त्रींचा खूप आदर देतो. पण मला वाटतं की आपण सर्वजण काही गोष्टी बोलू शकतो आणि नंतर त्या गोष्टी मागे घेऊ शकतो. पण तेव्हा माझी प्रचंड कुचंबणा होत होती.

‘…तरीही पार्टीत सहभागी झालो’ तो म्हणाला, की तुमच्या जोडीदाराचं यश किती महत्त्वाचं आहे, याविषयी आम्ही या गोष्टी सांगतो. कुलदीपच्या बाबतीत मला आनंद झाला. जे मी करू शकलो नाही, ते कुलदीपनं तेव्हा करून दाखवलं. मग वाटलं की मी एकटा पडलोय. अशा परिस्थितीत सेलिब्रेशन किंवा पार्टीला कसा जाऊ शकतो? तो म्हणाला, की तो त्याच्या खोलीत गेला, पत्नी आणि मुलांशी बोलला. काही वेळानं तो बाहेर गेला आणि नंतर टीमसोबतच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. कारण संघासाठी ती मोठी गोष्ट होती.

‘पहिली कसोटी कटू’ कसोटी मालिकेत मी माझं सर्वस्व दिलं. आम्हाला पहिली कसोटी विसरायलाच आवडेल. मी 50पेक्षा जास्त षटकं टाकली, तीन विकेट घेतल्या. पण मी ऐकलं की नाथननं 6 विकेट घेतल्या आहेत आणि आश्विनला फक्त तीन विकेट घेता आल्या.

‘मी गोष्टी मनावर घेत नाही’ जेव्हा रवी शास्त्री माझ्याशी बोलले, त्यावेळी खूप त्रास झाला. मी अनेक लोकांना ओळखतो, जे अशा गोष्टी मनावर घेतात पण मी त्यांच्यापैकी नाही. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. लोकांचे वागणे बदलते, जे लोक आज तुमच्यासाठी वाईट आहेत, ते उद्या चांगलेही असू शकतात.

सर्वच प्रकाराच चांगला खेळ रवीचंद्रन आश्विननं गेल्या एका वर्षभरात कसोटी क्रिकेट असो किंवा व्हाइट बॉल क्रिकेट. उत्तम खेळ केलाय. 2021मध्ये त्यानं 8 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 52 विकेट घेतल्या आहेत. 2021मध्ये केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नाही तर T20 क्रिकेटमध्येही त्यानं चांगलं पुनरागमन केलं. त्यानंतर त्याला T20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली.

Kidambi Srikanth BWF : श्रीकांतनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर गोपीचंद यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय

R Ashwin : आर. आश्विननं केला मोठा खुलासा..; म्हणाला, ‘या’ कारणासाठी आला होता निवृत्तीचा विचार

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.