Ravichandran ashwin: रोहितने दाखवलेल्या मनाच्या मोठेपणावर आर.अश्विनने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
कॅप्टन रोहित शर्माने अपील मागे घेतलं. त्यामुळे शनाका त्याची सेंच्युरी पूर्ण करु शकला. तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने 67 धावांनी विजय मिळवला.
Ravichandran Ashwin On Rohit Sharma: टीम इंडियाने पहिल्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेला 67 धावांनी हरवलं. या मॅचमध्ये भारताकडून स्टार बॅट्समन विराट कोहलीने शतक ठोकलं. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने सुद्धा 108 धावांची तुफानी खेळी केली. पहिल्या वनडे मॅचमध्ये मोहम्मद शमी लास्ट ओव्हर टाकत होता. त्याने श्रीलंकन कॅप्टन शनाकाला नॉन स्ट्रायकर एंडवर आऊट केलं. पण कॅप्टन रोहित शर्माने नंतर अपील मागे घेतलं. त्यामुळे शनाकाला शतक पूर्ण करता आलं. आता टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने रोहितच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. याबद्दल जाणून घेऊया.
शेवटच्या ओव्हरमध्ये हायवोल्टेज ड्रामा
शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका 98 धावांवर खेळत होता. शतकापासून तो फक्त 2 रन्स दूर होता. त्यावेळी मोहम्मद शमीने नॉन-स्ट्रायकर एंडवर शनाकाला आऊट केलं. पण नंतर कॅप्टन रोहित शर्माने अपील मागे घेतलं. त्यामुळे शनाका त्याची सेंच्युरी पूर्ण करु शकला. तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने 67 धावांनी विजय मिळवला.
अश्विनने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
आता रविचंद्रन अश्विन यावर व्यक्त झाला आहे. “मोहम्मद शमीने दासुन शनाकाला रनआऊट केलं. रोहितने त्याचं अपील मागे घेतलं. लगेच लोकांनी त्याबद्दल टि्वट केलं. मी फक्त एकच गोष्ट सांगीन मित्रांनो, अशा पद्धतीने Out करणं हे वैध आहे, योग्य आहे. यावर कुठलही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत नाही”
आऊट देणं ही अंपायरची ड्युटी
“तुम्ही LBW किंवा कॅच आऊटच अपील केलं, तर कोणी विचारणार नाही, सरळ आऊट दिलं जाईल. पण अशा प्रकारच्या रनआऊटमध्ये कॅप्टनची परवानगी का हवी?. बॉलरने अपील केलं, तर आऊट देऊन विषय संपवला पाहिजे. कुठल्याही फिल्डरने अपील केलं, तर आऊट देणं ही अंपायरची ड्युटी आहे” असं अश्विन म्हणाला.
अश्विनने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
टीम इंडियाचा सिनियर स्पिनर रविचंद्रन अश्विन मांकडिंगचा समर्थक आहे. अश्विनने अनेकदा मांकडिंगच समर्थन केलय. मांकडिंग हे खेळ भावनेला धरुन नाही, असं काही क्रिकेटपटूंच मत आहे. पण आयसीसीच्या नियमानुसार, मांकडिंग वैध आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये जेव्हा हे झालं, त्यावरुन वादविवाद सुरु आहेत. काही रोहित शर्माच कौतुक केलं. त्याने मनाचा मोठेपणा दाखवला असं म्हटलं जातय. पण अश्विनने कॅप्टनच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.