CSK vs KKR, IPL 2022: कॅप्टन होताच Ravindra Jadeja च्या चुकीमुळे CSKचं मोठं नुकसान! पहिल्याच सामन्यात फटका

CSK vs KKR, IPL 2022: आयपीएल 2022 चं (IPL 2022) रणशिंग फुंकलं गेलंय. पहिल्या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता होता. दोन नवे कॅप्टन आणि 2022 ची पहिलीच मॅच म्हटल्यावर उत्साह शिगेला पोहोचलेला नसता, तरच नवल!

CSK vs KKR, IPL 2022: कॅप्टन होताच Ravindra Jadeja च्या चुकीमुळे CSKचं मोठं नुकसान! पहिल्याच सामन्यात फटका
रवींद्र जाडेजा सीएसके कॅप्टन Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 10:17 PM

मुंबई: आयपीएल 2022 चं (IPL 2022) रणशिंग फुंकलं गेलंय. पहिल्या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता होता. दोन नवे कॅप्टन आणि 2022 ची पहिलीच मॅच म्हटल्यावर उत्साह शिगेला पोहोचलेला नसता, तरच नवल! चेन्नईचं नेतृत्त्व आता धोनीऐवजी रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) करतोय. त्याच्या नेतृत्त्वाकडे सगळ्यांची बारीक नजर लागलेली होती. पण 2022च्या आपल्या पहिल्या सामन्यात जडेजाची एक मोठी चूक संघाला चांगलीच महागात पडली. पहिल्यांना बॅटिंगसाठी उतरलेली चेन्नईची टीम कोलकाच्या (CSK vs KKR) गोलंदाजांसमोर अडखळली. झटपट विकेट्स गेल्यानंतर जेव्हा जडेजा आणि अंबाती रायडूची जोडी खेळत होती, तेव्हा जडेजाच्या एका चुकीनं सीएसकेला मोठा धक्का दिला. सीएसकेनं आपले तीन विकेट्स अवघ्या 49 धावांवर गमावले होते. त्यानंतर कॅप्टन रविंद्र जडेजानं स्वतः आपल्या खांद्यावर जबाबादारी घेतली. बॅटिंगसाठी खुद्द जडेजा मैदानात उतरला. खरंतर जडेजाआधी धोनी मैदानात उतरणं अपेक्षित होतं. पण धोनीऐवजी मैदानात कॅप्टनच्या रुपात उतरलेल्या जडेजानं बॅटिंग येत जबाबदारी तर आपल्या खांद्यावर घेतली. पण त्यासोबतच त्यानं एक चूकही केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होत असलेल्या या सामन्यात जडेजाच्या या चुकीची शिक्षा संघाला भोगावी लागली.

काय होती जडेजाची चूक?

कोलकातासोबतच्या सामन्यात चेन्नईनं फलंदाजीनं सामन्याला सुरुवात केली. पण कोलकाताच्या बॉलर्सनी भेदक मारा केला. चेन्नईच्या फलंदाजाचा रनरेट तर वाढवला आला नाहीच. पण त्यांना विकेट्सही वाचवता आल्या नाहीत. स्वतःत तीन विकेट्स गेल्यानंतर जडेजा जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्यासोबत अंबाती रायडू आधीच मैदानात खेळत होता. आठव्या ओव्हरमध्ये चेन्नईच्या 3 विकेट्सवर 49 धावा झाल्या होत्या.

यानंतर रायडूला साथ देण्यासाठी जडेजा मैदानातआ उतला होता. गेल्या काही आयपीएलमध्ये रायडू चांगल्या फॉर्मातही दिसला होता. त्यामुळे चेन्नईच्या संघाला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षाही होत्या.

अवघ्या चार चेंडू खेळलेल्या जडेजानं नेमकी याच क्षणी मोठी चूक केली. नवव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जडेजानं मिडविकेटच्या दिशेन शॉट मारला. यानंतर जडेजा रन घेण्यासाठी धावला. रायडूलाही त्यांना रन घेण्यासाठी कॉल दिला. पण मध्येच श्रेयस अय्यर जास्त वेगानं बॉलच्या दिशेनं येतोय, हे पाहून जडेजा मागे फिरला. पण रायडू बराच पुढे निघून गेला होता. अखेर फटका बसला. रायडूला रन आऊट करण्यात कोलकाता यश आलं. नवव्या ओव्हरमध्येच सीएसकेला आणखी एक मोठा धक्का बसला.

आपल्याकडून चूक झाली आहे, याची जाणीव जडेला झाली होती. रायडूही रनआऊट झाल्यामुळे निराशही झाला आणि हताशही. कोणतीही चूक नसताना आपली विकेट गेल्याचा पश्चापात त्याला झाला. पण तोपर्यंत सीएसकेचे चार विकेट्स पडले होते आणि स्कोअर झाला होता फक्त 52 धावा!

..आणि धोनीनं सावरलं!

एके क्षणी तर सीएसकेचा स्कोअर 100 धावांच्या पार जाईल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली. मात्र धोनी क्रीझवर फक्त आपला अनुभवच कामी नाही आणला, तर वेळप्रसंगी आपण किती रोखठोक फलंदाजी करु शकतो, हे देखील दाखवून दिलं. धोनीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेनं अखेर 131 धावांपर्यंत मजल मारली. धोनी आणि जडेजानं मिळून 70 धावांची भागीदारी केली. अवघ्या 55 धावांत केलेल्या या भागीदारीमुळे आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात सीएसके सन्माजनक धावसंख्या उभारु शकली.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.