Asia cup 2022: Ravindra jadeja बाहेर गेल्यामुळे चार आघाड्यांवर टीम इंडियाचं मोठं नुकसान, कसं ते समजून घ्या….
आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेत सुपर-4 फेरीचे सामने उद्यापासून सुरु होत आहेत. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
मुंबई: आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेत सुपर-4 फेरीचे सामने उद्यापासून सुरु होत आहेत. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीमचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. गुडघे दुखापतीमुळे जाडेजा यापुढचे सामने खेळू शकणार नाहीय. रवींद्र जाडेजाच्या जागी संघात अक्षर पटेलचा (Axar Patel) समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. टी 20 वर्ल्ड कप जवळ आला आहे. या दरम्यान जाडेजाची दुखापत भारतासाठी चांगली बाब नाहीय. रवींद्र जाडेजा बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाचं काय नुकसान होऊ शकतं, ते समजून घ्या.
- रवींद्र जाडेजा सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. फलंदाज म्हणून टीम इंडिया त्याला नक्कीच मिस करेल. पाकिस्तान विरुद्ध जाडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो 35 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग खेळून गेला. हार्दिक पंड्यासोबत त्याने 29 चेंडूत 52 धावांची अमुल्य भागीदारी केली. याच पार्ट्नरशिपने टीमचा विजय निश्चित केला. त्यामुळे फलंदाज म्हणून त्याची उणीव नक्कीच जाणवेल.
- गोलंदाजी मध्येही रवींद्र जाडेजाला लय सापडली होती. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पाकिस्तान विरुद्ध 2 षटकात 11 धावा दिल्या. हाँगकाँग विरुद्ध 4 ओव्हर्स मध्ये 15 धावा देऊन 1 विकेट काढला. जाडेजाचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर फक्त 4.33 आहे. राशिद खान नंतर हा चांगला इकॉनमी रेट आहे.
- रवींद्र जाडेजा उत्तम फिल्डर आहे. क्रिकेट विश्वातील टॉप फिल्डर्स मध्ये त्याची गणना होते. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात त्याने एक जबरदस्त रनआऊट घेतला. या रॉकेट थ्रो ने त्याने चाहत्यांची मन जिंकून घेतली. टीम इंडिया उत्तम क्षेत्ररक्षकाला मुकणार आहे.
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीमवर एक वेगळा दबाव असतो. त्यावेळी टीम इंडियाला त्याची उणीव जाणवेल. टीम इंडियाला जाडेजाची रिप्लेसमेंट मिळालीय. पण त्याच्यासारखा अनुभव कोणाकडे नाहीय. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कठीण परिस्थितीत उत्तम प्रदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे. अक्षर पटेल रवींद्र जाडेजाची जागा कितपत भरुन काढू शकतो, ते लवकर स्पष्ट होईल. फक्त जाडेजाची दुखापत गंभीर नसावी, एवढीच अपेक्षा आहे.