जाडेजाच्या नावाने भारतीय क्रिकेपटूच्या पत्नीकडून संजय मांजरेकरांची बोलती बंद, VIDEO व्हायरल
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) नात्याबद्दल सगळ्या जगाला माहित आहे.
मुंबई: संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) नात्याबद्दल सगळ्या जगाला माहित आहे. रवींद्र जाडेजाने सार्वजनिक मंचावर संजय मांजरेकरांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. मांजरेकरांनी अनेकदा जाडेजाची क्षमता, टॅलेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. त्यामुळे दोघांमध्ये फार संवाद आणि सख्य नाहीय. पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) विजयानंतर रवींद्र जाडेजा आणि संजय मांजरेकरांमध्ये बोलणं झालं. हा चर्चेचा विषय आहे. मांजरेकर पुन्हा एकदा जाडेजामुळे चर्चेत आहेत. यावेळी स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर यामागे आहे.
जाडेजाच नाव घेऊन मांजरेकरांना टोमणा
बांगलादेश आणि अफगाणिस्तान मध्ये काल सामना झाला. मयंतीने स्टुडिओ मध्ये चर्चासत्राच्या कार्यक्रमात यावेळी रवींद्र जाडेजाचं नाव घेतलं. संजय मांजरेकरांनी गोलंदाजांना सल्ला दिला. गोलंदाजांनी आपली षटकं लवकर संपवली पाहिजेत. म्हणजे 30 यार्ड मध्ये 5 खेळाडूंना ठेवण्याची वेळ येऊ नये. मयंती लँगर यावर म्हणाली की, “मांजरेकर मला म्हणावं लागेल, प्रत्येक जण रवींद्र जाडेजा नसतो”. मयंतीच्या या उत्तरावर मांजरेकर गप्पच बसले”
मयंती खूप वेळ हसत होती
रवींद्र जाडेजा वेगाने आपली षटकं संपवण्यासाठी ओळखला जातो. म्हणून मयंतीने त्याचं नाव घेतलं. ती क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. जाडेजाचं नाव घेतल्यानंतर मयंती बराचवेळ हसत होती. पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकल्यानंतर प्रेझेंटेशन झालं. त्यावेळी माइक संजय मांजरेकरांच्या हाती होता. संजय मांजरेकरांनी जाडेजाला विचारलं, तुम्ही माझ्याशी सहजतेने बोलाल का? त्यावर जाडेजाने होकारार्थी उत्तर दिलं. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाक विरुद्धच्या विजयात महत्त्वाच योगदान
रवींद्र जाडेजाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जाडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने 29 चेंडूत 35 धावा फटकावल्या. जाडेजा आणि हार्दिक पंड्यामध्ये 52 धावांची विजयी भागिदारी सुद्धा झाली. त्याच बळावर भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला.