Ravindra Jadeja – त्याच्याजागी जाडेजाला बनवलं कॅप्टन, 3 मॅचमध्ये 17 विकेट घेणारा बॉलर नाही खेळणार

Ravindra Jadeja - आशिया कप स्पर्धे दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पुढचे काही महिने त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही.

Ravindra Jadeja - त्याच्याजागी जाडेजाला बनवलं कॅप्टन, 3 मॅचमध्ये 17 विकेट घेणारा बॉलर नाही खेळणार
Ravindra jadeja Image Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 12:14 PM

अहमदाबाद – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आता पूर्णपणे फिट झालाय. आशिया कप स्पर्धे दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पुढचे काही महिने त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. रवींद्र जाडेजा आता पूर्णपणे फिट झालाय. जाडेजा पुनरागमनासाठी तयार आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या रणजी सामन्यात रवींद्र जाडेजा खेळणार आहे. सौराष्ट्रासाठी तो रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तामिळनाडू विरुद्ध हा सामना होईल. रवींद्र जाडेजाला या सामन्यासाठी सौराष्ट्रच कॅप्टन बनवण्यात आलय.

कॅप्टन का बदलला?

जयदेव उनाडकट सौराष्ट्राचा फुलटाइम कॅप्टन आहे. पण चेन्नईमध्ये होणाऱ्या सामन्यात जाडेजा सौराष्ट्राचा कॅप्टन असेल. जाडेजाला कॅप्टन का बनवलं? जयदेवला बदलून जाडेजाला कॅप्टन का बनवलं? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. याचं कारण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी.

हे सुद्धा वाचा

म्हणून जयदेवला दिला आराम

सौराष्ट्राचा कॅप्टन जयदेव उनाडकटला या सामन्यात आराम देण्यात आलाय़. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. म्हणून जयदेव उनाडकटला आराम देण्यात आलय. बांग्लादेश दौऱ्यावर जयदेव उनाडटक दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला. दुसऱ्याबाजूला रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इतके महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. मॅच प्रॅक्टिससाठी तो तामिळनाडू विरुद्ध रणजी सामन्यात खेळणार आहे. जयदेवची जागा भरुन काढणं सोपं नाही

रवींद्र जाडेजासाठी जयदेव उनाडकटची कमतरता भरुन काढणं इतकं सोपं नसेल. जयदेवने या टीमला फ्रंटवरुन लीड केलय. त्याने 3 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळेच सौराष्ट्राची टीम ग्रुप बी मध्ये टॉपवर आहे. आता जयदेवला आराम देण्यात आलाय. रवींद्र जाडेजाला स्वत:ला सिद्ध कराव लागेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजआधी सूर सापडणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची टेस्ट सीरीज 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.