IPL 2022:Virat शुन्यावर OUT होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर आत काय घडलं? मन जिंकणाऱ्या कृतीचा VIDEO व्हायरल

IPL 2022: मागच्या दोन वर्षाच्या Virat kohli च्या बॅटमधून एक शतकही निघालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी विराटला बाहेर बसवण्याचाही कोणी विचार केला नसता, त्याची सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बरोबर तुलना सरु होती.

IPL 2022:Virat शुन्यावर OUT होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर आत काय घडलं? मन जिंकणाऱ्या कृतीचा VIDEO व्हायरल
विराट कोहलीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:08 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीजनमध्ये विराट कोहली (Virat kohli) काल गोल्डन डकवर आऊट झाला. तो शुन्यावर बाद झाला. इतरवेळी विराटच बाद होणं आणि कालचं आऊट होणं, यात फरक होता. कारण विराटचा सध्या फॉर्मसाठी प्रचंड संघर्ष सुरु आहे. विराटचा हाच फॉर्म कायम राहिला, तर त्याला भारतीय संघातही स्थान मिळणार नाही. मागच्या दोन वर्षाच्या त्याच्या बॅटमधून एक शतकही निघालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी विराटला बाहेर बसवण्याचाही कोणी विचार केला नसता, त्याची सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बरोबर तुलना सरु होती. पण आता हाच विराट करीयरच्या खूप खराब काळातून जातोय. अशावेळी त्याला धीर, आधार देण्याची गरज आहे. काल सनरायजर्स हैदराबादच्या जगदीश सुचिताच्या पहिल्याच बॉलवर विराट बाद झाला. त्याने कॅप्टन केन विलियमसनकडे सोपा झेल दिला. अशा प्रकारे शुन्यावर आऊट होण्याची हताशा विराटच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

मन जिंकून घेणारी कृती

तो खिन्न पावलांनी पॅव्हेलियनकडे परतला. विराट पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर त्याची हताशा, निराशा ओळखून RCB चे हेड कोच संजय बांगर त्याच्याकडे धावले. त्यांनी विराटला आधार दिला. विराटला समजून घेतलं. त्यांच्या या कृतीने सोशल मीडियावर मन जिंकून घेतलं आहे. संजय बांगर यांनी विराटच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आधार दिला. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. विराटने आयपीएलच्या या सीजनमध्ये 12 इनिंग्समध्ये फक्त 216 धावा केल्यात. यात एक अर्धशतक आहे. खरंतर विराट सारख्या प्लेयरच्या करीयरचा ग्राफ बघितला, तर ही कामगिरी त्याच्या लौकीकाला शोभणारी नाहीय.

गोल्डन डकवर आऊट होण्याची सहावी वेळ

संजय बांगर यांनी त्यावेळी जे केलं, त्याचं सर्वत्र कौतुक होतय. आयपीएलमध्ये कोहली  याआधी सुद्धा गोल्डन डकवर आऊट झालाय. याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध 2008 मध्ये, पंजाब किंग्स विरुद्ध 2014, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध 2017 त्यानंतर 2022 मध्ये लखनौ सुपरजायंट्स, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोहली शुन्यावर आऊट झलाय. विराट कोहली भारताचा स्टार क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडून टीम इंडियाला भरपूर अपेक्षा आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.