आयपीएल 2025 लिलावात आरसीबी आणि पंजाब किंग्स सर्वात श्रीमंत फ्रेंचायझी, रिटेन्शनमध्ये टाकले असे फासे

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी सर्वच संघांनी आपले पत्ते ओपन केले आहेत. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मेगा लिलावात कोणते खेळाडू दिसणार हे निश्चित झालं आहे. या रिटेन्शन यादीत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठी खेळी आहे. त्यामुळे मेगा लिलावात आता या दोन संघांचा पत्ता चालणार आहे.

आयपीएल 2025 लिलावात आरसीबी आणि पंजाब किंग्स सर्वात श्रीमंत फ्रेंचायझी, रिटेन्शनमध्ये टाकले असे फासे
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 7:33 PM

आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी आता दहाही संघ सज्ज झाले आहेत. 31 ऑक्टोबरला दहाही फ्रेंचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता इतर खेळाडूंचा लिलावासाठी मार्ग मोकळा झाला आहे. काही फ्रेंचायझींसाठी राईट टू कार्ड हा पर्याय असणार आहे. त्यामुळे मेगा लिलावात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळणार आहे. कारण आरटीएम केलेला खेळाडू परत संघात घेणं खरंच खूप कठीण जाणार आहे. कारण पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम आहे. त्यामुळे त्यांच्याशी लिलावात सामना करणं इतर फ्रेंचायझींना कठीण जाणार आहे. आयपीएल रिटेन्शन यादीत पंजाब किंग्सने सर्वात कमी रक्कम खर्च केली आहे. 120 कोटी रुपयांपैखी फक्त 9.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पंजाबच्या पाकिटात आता 110.5 कोटी रुपये असणार आहे. त्यामुळे अपेक्षित खेळाडूसाठी हवी ती रक्कम मोजता येणार आहे. पंजाब किंग्स श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजणार असं दिसत आहे. कारण शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग या दोन अनकॅप्ड खेळाडूंना 9.5 कोटी रुपयात रिटेन केलं आहे.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फक्त तीन खेळाडू रिटेन केले आहेत. यात विराट कोहलीसाठी 21 कोटी रुपये मोजले आहेत. रजत पाटीदारसाटी 11 कोटी, तर यश दयालसाठी 5 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे आरसीसीबने खेळाडूंच्या रिटेन्शनसाठी 37 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आरसीबीच्या पाकिटात 83 कोटी रुपये आहेत. त्यामुळे आरसीबीही मेगा लिलावात सर्वाधिक पैसे खर्च करताना दिसणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सने 51 कोटी रुपये रिटेन्शनवर खर्च केले आहेत. लखनौकडे 69 कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सने फक्त चार खेळाडू रिटेन केले आहेत. या 44.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे दिल्लीकडे 75.25 कोटी रुपये आहेत. मुंबई इंडियन्सने 75 कोटी रुपये पाच खेळाडूंवर रिटेन्शसाठी खर्च केले आहेत. मुंबईकडे 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.

राजस्थान रॉयल्सने खेळाडूंच्या रिटेन्शसाठी सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. राजस्थानने 79 कोटी खर्च केले असून 41 कोटी शिल्लक आहेत. सनरायझर्स हैदराबादने 75 कोटी रुपये खर्च केले असून 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.कोलकाता नाईट रायडर्सने 57 कोटी खर्च केले असून 63 कोटी शिल्लक आहेत.गुजरात टायटन्सने 51 कोटी खर्च केले असून 69 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.