RCB vs DC IPL 2023 Highlight : दिल्लीवर पुन्हा पराभवाची नामुष्की, बंगळुरु विरुद्धचा सामनाही गमावला

| Updated on: Apr 15, 2023 | 7:14 PM

RCB vs DC IPL 2023 Highlight : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं जबरदस्त पुनरागमन केलं. दिल्लीला 23 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

RCB vs DC IPL 2023 Highlight : दिल्लीवर पुन्हा पराभवाची नामुष्की, बंगळुरु विरुद्धचा सामनाही गमावला
दिल्लीची हाराकिरी सुरु, स्पर्धेतील सलग पाचवा पराभव

मुंबई : दिल्लीवर पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढावली आहे. बंगळुरुने दिलेलं 175 धावांचं आव्हान गाठताना फलंदाजांची घसरगुंडी सुरु झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. दहा संघांमध्ये पहिल्या दोन संघात स्थान मिळवणं अशक्यप्राय आहे. त्यामुळे पुढचे काही सामने जिंकत गुण आणि स्थान सुधारण्यावर जोर द्यावा लागेल.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 15 Apr 2023 07:12 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीची हाराकिरी सुरु, स्पर्धेतील सलग पाचवा पराभव

    मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला.  175 धावांचं आव्हान गाठताना एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे,  दिल्लीवर सलग पाच पराभवाची नामुष्की ओढावली आहे. सलग पाच पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे, असंच म्हणावं लागेल.  कारण पाच पराभवानंतर गुणतालिका बदलणं आता कठीण आहे. त्यामुळे दिल्ली पहिला संघ या स्पर्धेतून बाहेर गेला असंच चित्र आहे. आता जर तरचं गणित देखील कठीण झालं आहे. कारण इतर नऊ संघाच्या खात्यात चांगल्या धावगतीसह गुण आहेत.

  • 15 Apr 2023 07:11 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सचा डाव

    विजयी धावांचा आकडा गाठताना दिल्लीची फलंदाजी सुरुवातीला अडखळली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेला पृथ्वी शॉ स्वस्तात धावचीत झाला. त्यानंतर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर मिशेल मार्श आला आणि 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. तो तंबूत परतत नाही तोच यश धुल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत होत बाद झाला. त्याने 4 चेंडूत अवघी एक धाव केली.

    संघावर दडपण असताना डेविड वॉर्नर डाव सावरेल असं वाटत होतं. पण तोही काही खास करू शकला नाही. 13 चेंडूत 19 धावा करून विशाक विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.

    अभिषेक पोरेलकडून अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तोही 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे जोडी जमली. ही जोडी फोडण्यात विशाक विजयकुमारला यश आलं.

    अक्षर पटेल 14 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेनं आक्रमक खेळी सुरु ठेवली. अर्धशतक ठोकल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला.

    ललित यादवच्या रुपाने दिल्लीला आठवा धक्का बसला. विशाकच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलनं त्याचा झेल घेतला. त्याला अवघ्या चार धावा करता आल्या. अमन खानही काही खास करू शकला नाही. 10 चेंडूत 18 धाव करून बाद झाला.

  • 15 Apr 2023 07:00 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | अमन खान बाद

  • 15 Apr 2023 06:51 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | ललित यादवला विशाकने दाखवला तंबूचा रस्ता

  • 15 Apr 2023 06:41 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | मनिष पांडेचं वादळ हसरंगानं रोखलं

  • 15 Apr 2023 06:38 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | मनिष पांडेची अर्धशतकी खेळी

  • 15 Apr 2023 06:35 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीची घसरगुंडी सुरुच, अक्षर पटेल बाद झाल्यानं दबाव वाढला

  • 15 Apr 2023 06:14 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | अभिषेक पेरोल 5 धावा करून बाद

  • 15 Apr 2023 05:57 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीच्या फलंदाजांची घसरण, डेविड वॉर्नरच्या रुपाने चौथा धक्का

  • 15 Apr 2023 05:50 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | यश धुलही 1 धाव करून तंबूत

  • 15 Apr 2023 05:35 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | मिशेल मार्श स्वस्तात बाद

  • 15 Apr 2023 05:32 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | पृथ्वी शॉच्या रुपाने पहिला धक्का

  • 15 Apr 2023 05:11 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव

    दिल्ली कॅपिटल्सने नाणफेक जिंकत बंगळुरु संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. या सामन्यात फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली जोडीने सावध सुरुवात करून दिली. पॉवर प्लेममध्ये चौकार आणि षटकार ठोकत विकेट राखून ठेवण्याचा प्रयत्न केला.  संघाच्या 42 धावा असताना फाफ डु प्लेसिस बाद झाला. त्याने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली. मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अमिन हकीमनं जबरदस्त झेल घेतला.

    विराट कोहलीने एका बाजूने डाव सावरला. आक्रमक फटकेबाजी करत संघासाठी धावा केल्या. 34 चेंडूत त्याने 50 धावांची खेळी केली. ललित यादवच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

    महिपाल लोमरोरही काही खास करू शकला नाही 18 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर थोडा डाव सावरण्याचा ग्लेन मॅक्सवेलनं प्रयत्न केला. पण त्यालाही फार काही करता आलं नाही.

    अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हर्षल पटेल बाद झाला आणि त्याच्या पुढचं षटक कुलदीप यादवला सोपण्यात आलं. मग काय पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक खांतही खोलू शकला नाही. आला तसाच माघारी गेला.

  • 15 Apr 2023 05:10 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीपुढे बंगळुरुनं ठेवलं 175 धावांचं आव्हान

    आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अपेक्षित धावसंख्या करू शकली नाही. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावसंख्या मंदावली. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी धावा केल्या आणि विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहलीने 34 चेंडूत 50 धावां खेळी केली. आता हे विजयी आव्हान दिल्ली कसं गाठते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 15 Apr 2023 04:42 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | बंगळुरुला एका पाठोपाठ एक तीन झटके

    हर्षल पटेल बाद झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिकही काही खास करु शकला नाही. पहिल्याच चेंडूवर झेल बाद होत तंबूत परतला.

  • 15 Apr 2023 04:36 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | महिपाल लोमरोर 26 धावा करून बाद

  • 15 Apr 2023 04:16 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | बंगळुरुला विराटच्या रुपाने दुसरा धक्का

    विराट कोहली 34 चेंडूत 50 धावा करून बाद झाला आहे. ललित यादवच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

  • 15 Apr 2023 04:13 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | विराट कोहलीचं अर्धशतक

    विराट कोहलीने दिल्ली विरुद्ध आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं आहे.

  • 15 Apr 2023 03:49 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | फाफ डु प्लेसीसच्या रुपाने बंगळुरुला पहिला धक्का

  • 15 Apr 2023 03:35 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | सलग दोन चौकारांसह विराटची जबरदस्त खेळी

  • 15 Apr 2023 03:10 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

  • 15 Apr 2023 03:08 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख

  • 15 Apr 2023 03:02 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजीचा निर्णय

  • 15 Apr 2023 01:48 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीत एक दोन खेळाडूच करतात परफॉर्म

    दिल्ली कॅपिटल्सकडे फलंदाजी आणि गोलंदाजीचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. मात्र एक दोन खेळाडूच परफॉर्म करत असल्याचं चित्र आहे. डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेलनं मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. तर एनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमारनं चांगली गोलंदाजी केली होती. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.

  • 15 Apr 2023 01:44 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | आरसीबीची टॉप ऑर्डर फॉर्मात

    आरसीबीचे टॉप 3 खेळाडू म्हणजेच डुप्लेसिस, कोहली आणि मॅक्सवेल चांगल्याच फॉर्मात आहेत. या व्यतिरिक्त दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद चांगले फिनिशर आहेत. असं असलं तरी मागच्या दोन सामन्यात मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी साजेशी कागमिरी केलेली नाही.

  • 15 Apr 2023 01:42 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

  • 15 Apr 2023 01:41 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ

    बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

Published On - Apr 15,2023 1:40 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.