RCB vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, बंगळुरुचा घरच्या मैदानात पराभव

| Updated on: Apr 11, 2023 | 1:20 AM

RCB vs LSG IPL 2023 Highlights In Marathi |आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 15 वा सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर 1 धावा काढत रॉयल चॅलेंजर्सवर 1 विकेटने विजय मिळवला.

RCB vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, बंगळुरुचा घरच्या मैदानात पराभव

बंगळुरु | लखनऊ सुपर जायंट्सने हायव्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 1 विकेटने विजय मिळवला आहे. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 213 रन्सचं टार्गेट दिलं होतं. लखनऊने हे आव्हान शेवटच्या बॉलवर 9 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीवर विजय मिळवला. निकोलस पूरन लखनऊच्या विजयाचा शिल्पकार ठरला. निकोलसने 19 बॉलमध्ये 62 धावांची वादळी खेळी केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 10 Apr 2023 11:35 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊचा शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय

    लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी शेवटच्या बॉलमध्ये 1 धावेची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या आवेश खान याच्याकडून बॉल मिस झाला. तसेच विकेटकीपर दिनेश कार्तिक याला बॉल निट धरता आला नाही. याचाच फायदा घेत आवेश खान याने धाव घेतली आणि लखनऊने 1 विकेटने सनसनाटी विजय मिळवला.

  • 10 Apr 2023 11:30 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला नववा झटका

    लखनऊला विजयासाठी शेवटच्या 1 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 10 Apr 2023 11:12 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | निकोलस पूरन याची वादळी खेळी समाप्त

    निकोलस पूरन आऊट झाला आहे. निकोलस पूरन याने 19 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. निकोलसने यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला.

  • 10 Apr 2023 10:50 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊची सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    निकोलस पूरन आणि आयूश बदोनी या जोडीने 20 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीच्या भागीदारीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 10 Apr 2023 10:35 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | कॅप्टन केएल राहुल आऊट

    मार्क्स स्टोयनिस याच्यानंतर कॅप्टन केएल राहुल आऊट झाला आहे. केएलने 20 बॉलमध्ये 18 धावा केल्या.

  • 10 Apr 2023 10:31 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | मार्क्स स्टोयनिस आऊट

    मार्क्स स्टोयनिस जोरदार फटकेबाजी केल्यानंतर कॅचआऊट झाला आहे. लखनऊला चौथा झटका लागला आहे. मार्क्सने 30 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली. मार्क्सने 5 सिक्स आणि 6 फोर ठोकले.

  • 10 Apr 2023 10:28 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊचं कमबॅक,  मार्क्स स्टोयनिसचं अर्धशतक

    1.  मार्क्स स्टोयनिस याने खणखणीत सिक्स ठोकत 26 बॉलमध्ये अर्धसतक पूर्ण केलं आहे.  मार्क्सच्या या खेळीमुळे लखनऊने सामन्यात कमबॅक केलं आहे. लखनऊने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 91 धाा केल्या आहेत. त्यामुळे लखनऊला विजायासठी पुढील 10 ओव्हरमध्ये  आणखी 122 धावांची गरज आहे.
  • 10 Apr 2023 10:00 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला एका ओव्हरमध्ये 2 धक्के

    आरसीबीच्या वेन पार्नेल याने आपल्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका केला आहे. वेनने आपल्या ओव्हरमध्ये लखनऊला 2 झटके दिले. वेनने दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या या दोघांना आऊट केलं.

  • 10 Apr 2023 09:37 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला पहिला झटका, मेयर्स झिरोवर बोल्ड

    मोहम्मद सिराजने लखनऊला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. सिराजने कायले मेयर्सला क्लिन बोल्ड केलं आहे.  मेयर्सला भोपळाही फोडता आला नाही.

  • 10 Apr 2023 09:35 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात

    लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 213 रन्सचं टार्गेट दिलं आहे.

  • 10 Apr 2023 09:21 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला विजयासाठी 213 रन्सचं टार्गेट

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 213 रन्सचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 212 धावा केल्या. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी अर्धशतक ठोकलं. आरसीबीकडून कॅप्टन फाफ याने सर्वाधिक नाबाद 79, मॅक्सवेल याने 59 आणि विराटने 61 रन्सची खेळी केली. लखनऊकडून अमित मिश्रा आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 10 Apr 2023 09:17 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | ग्लेन मॅक्सवेल आऊट, आरसीबीला दुसरा धक्का

    आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. ग्लेन मॅक्सवेल 59 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 10 Apr 2023 09:08 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | विराट, फाफनंतर मॅक्सवेल याचं अर्धशतक

    विराट कोहली, फाफ डु प्लेसिस याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यानेही अर्धशतक ठोकलं आहे.  यासह आरसीबीच्या तिन्ही फलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  आयपीएलमध्ये पहिल्यांदाज आरसीबीच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली आहे.

  • 10 Apr 2023 08:50 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | विराटनंतर कॅप्टन फाफचं अर्धशतक

    विराट कोहली यांच्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याने सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. फाफने 35 बॉलमध्ये हे अर्धशतक झळकावलं. फाफने विराट आऊट झाल्यानंतर टॉप गिअर टाकत फटकेबाजी करत हे अर्धशतक पूर्ण केलं.

  • 10 Apr 2023 08:28 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | विराट कोहली आऊट

    आरसीबीने विराट कोहलीच्या रुपात पहिली विकेट गमावली आहे. विराट कोहली याने 44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने  61 धावांची खेळी केली.

  • 10 Apr 2023 07:59 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | विराट-फाफ याचा ‘पावर’ गेम

    विराट कोहली आणि फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 56 धावा केल्या आहेत. विराट आणि फाफ या दोघांनी दे दणादण फटकेबाजी करत पावरप्लेचा पूरेपूर फायदा घेतला.

    विराट-फाफचा पावर गेम

  • 10 Apr 2023 07:51 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | बंगळुरुची शानदार सुरुवात

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शानदार सुरुवात केली आहे.  कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये बिनबाद 42 धावा केल्या आहेत. विराट 30 आणि फाफ 10 धावांवर नाबाद आहेत.

  • 10 Apr 2023 07:32 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि  विराट कोहली  सलामी जोडी मैदानात आह. लखनऊने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 10 Apr 2023 07:15 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ प्लेइंग इलेव्हन

    लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

  • 10 Apr 2023 07:13 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | आरसीबी प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

  • 10 Apr 2023 07:02 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ सुपर जायंट्सचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

    लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकला आहे.  लखनऊचा कॅप्टन केएल राहुल याने टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 10 Apr 2023 06:41 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने?

    आरसीबी आणि लखनऊ आयपीएलमध्ये एकूण 2 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वरचष्मा राहिला आहे.  आरसीबीने दोन्ही सामन्यात लखनऊवर मात केली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आरसीबीने लखनऊ विरुद्ध विजयाची हॅटट्रिक करणार का, हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.

  • 10 Apr 2023 06:33 PM (IST)

    RCB vs LSG IPL 2023 Live Score | आरसीबी विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत

    आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत.  या सामन्याचं आयोजन हे आरसीबीच्या होम ग्राउंड अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. आरसीबीने या मोसमातील 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवलाय.  तर लखनऊने 3 पैकी 2 वेळा विजय नोदंवलाय. त्यामुळे आरसीबी लखनऊला घरच्या मैदानात पाणी पाजणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Published On - Apr 10,2023 6:30 PM

Follow us
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.