Rohit Sharma WTC Final : 5 दिवस, 5 चूका, ज्यामुळे फायनलमध्ये हरली टीम इंडिया

Rohit Sharma WTC Final : ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाच काहीच चाललं नाही, असं का?. टीम इंडियाने या मॅचमध्ये फक्त टॉस जिंकला. त्यानंतर सर्वच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं.

Rohit Sharma WTC Final : 5 दिवस, 5 चूका, ज्यामुळे फायनलमध्ये हरली टीम इंडिया
ind vs aus wtc final 2023
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 9:27 AM

लंडन : भारतीय क्रिकेट टीमला आयसीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही. भारताला रविवारी आयसीसी WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने हरवलं. भारताला 2013 नतंर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाहीय. यावेळी टीम इंडियाकडे दुष्काळ संपवण्याची संधी होती. पण असं झालं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताच स्वप्न मोडलं. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी मॅच जिंकली. टीम इंडियाच ऑस्ट्रेलियासमोर काहीच चाललं नाही. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं.

टीम इंडियाने या मॅचमध्ये फक्त टॉस जिंकला. त्यानंतर सर्वच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. तिथेच सामना भारताच्या हातून निसटला होता. टीम इंडियाने पाच दिवसात पाच चूका केल्या. त्यामुळे पराभव झाल.

1 – टीम इंडियाची गोलंदाजी WTC फायनलमध्ये प्रभावी ठरली नाही. टीम इंडियाचा कुठलाही गोलंदाज स्टीव स्मिथ, ट्रेविस हेडला रोखू शकला नाही. भारताने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट लवकर काढले होते. त्यानंतर स्मिथ-हेड जोडीने भारतीय गोलंदाजीची लय बिघडवली. पहिल्यादिवशी लय बिघडली, त्यानंतर शेवटपर्यंत तशीच स्थिती होती.

2- ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय फलंदाज धावा करतील अशी अपेक्षा होती. पण दुसऱ्यादिवशी भारतीय फलंदाज ढेपाळले. रोहित, विराट आणि चेतेश्वर सपशेल अपयशी ठरले.

3- तिसऱ्यादिवशी अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर टिकून होता. तो शतकाच्या जवळ होता. पण त्याला संधी साधता आली नाही. टीम इंडिया पहिल्या डावात 300 धावाही करु शकली नाही. भारताडून फक्त दोघांनी अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवल्या.

4- चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवायला हवा होता. पण असं झालं नाही. भारताला 444 रन्सच विशाल टार्गेट मिळालं. चौथ्या दिवशी रोहित शर्मा-शुभमन गिल चांगली सुरुवात देतील अशी अपेक्षा होती. पुजारा खराब शॉट खेळून आऊट झाला. 5 – पाचव्यादिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज होती. टीम इंडियाने चौथ्या दिवशी थोडी झुंज दिली होती. त्यामुळे पाचव्यादिवशी अपेक्षा होत्या. विराट आणि अजिंक्य क्रीजवर होते. पण कोहली खराब शॉट खेळून बाद झाला. रहाणे सुद्धा चालला नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.