IND vs BAN 1st Test: Rishabh Pant ची बालिश चूक, गिफ्टमध्ये दिली विकेट
IND vs BAN 1st Test: सेट झालेल्या बॅट्समनकडून अशी चूक कशी परवडणार
ढाका: बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराश केलं. वनडे सीरीज गमावणाऱ्या टीम इंडियाने टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात खराब परफॉर्मन्स केला. खासकरुन शुभमन गिल, केएल राहुल आणि विराट कोहली लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. ते बाद झाल्यानतंर ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा त्याने तीच चूक केली, ज्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका होते. ऋषभ पंतने क्रीजवर सेट झाल्यानंतर खराब फटका खेळून आपला विकेट गमावला. तो 46 रन्सवर आऊट झाला.
एका सरासरी चेंडूवर असा झाला आऊट
ऋषभ पंतला मेहदी हसनच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. मेहदी हसनने टाकलेला एक सरासरी चेंडू पंतने रोखण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागून स्टम्पवर आदळला. पंतच अशा प्रकारे आऊट होणं, खूपच निराशाजनक होतं. कारण तो पूर्णपणे सेट झाला होता. त्याच्या आक्रमक खेळामुळे बांग्लादेशची टीम बॅकफुटवर होती.
अर्धशतक हुकलं
ऋषभ पंतने आपल्या नेहमीच्या शैलीत चटोग्राममध्ये इनिंगची सुरुवात केली. त्याने मैदानात येताच बाऊंड्री मारायला सुरुवात केली. पंतने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा जास्त होता. त्याची एक चूक भारी पडली.
.@RishabhPant17 breaches the 4000-run mark in international cricket ??#TeamIndia #BANvIND pic.twitter.com/zRxRG96UrH
— BCCI (@BCCI) December 14, 2022
पंतने गाठला खास टप्पा
पंत आज अर्धशतक झळकवू शकला नाही. त्याने आपल्या 46 रन्सच्या इनिंगमध्ये दोन टप्पे गाठले. त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये तो 50 षटकार ठोकण्यात यशस्वी ठरला. भारताकडून कमी डावात 50 षटकार ठोकणारा पंत पहिला विकेटकीपर आहे. पंतने 54 डावात 50 सिक्स मारले. रोहितने 51 इनिंगमध्ये हा कारनामा केलेला.