Rishabh Pant Accident ऋषभ पंत याच्या करिअरला धक्का? गुडघ्याचा एक्स-रे पाहून लावला जातोय कयास

Rishabh Pant Accident कार अपघातात गंभीर झाल्यानंतर त्याच्या पायालाही दुखापत झाली आहे. जेव्हा त्याच्या पायाचा एक्स-रे काढला त्यावरुन जो अंदाज काढला जातोय, तो नकोसा वाटतोय

Rishabh Pant Accident ऋषभ पंत याच्या करिअरला धक्का? गुडघ्याचा एक्स-रे पाहून लावला जातोय कयास
Rishabh pantImage Credit source: PTI/abhishereporter/twitter
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 1:49 PM

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीवरुन रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारला आग लागली. सुदैवाने या अपघातातून ऋषभचे प्राण वाचले. पण ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभची कार रुडकीच्या गुरुकुल नारसन क्षेत्रात डिवायडरला धडकली. जखमी ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून बाहेर पडला.

डेहराडूनच्या रुग्णालयात हलवलं

स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. “पहाटे 5.30 च्या सुमारास ऋषभ पंतच्या कारला अपघात झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यालाआधी रुडकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डेहराडूनच्या रुग्णालयात हलवलं. तो स्वत: कार चालवत होता. तो गाडीत एकटाच होता” अशी माहिती पोलीस अधिकारी एसके सिंह यांनी दिली.

एक्स रे समोर आला

सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या कथित गुडघ्याचा एक्स-रे फोटो समोर आलाय. एक्स-रेमध्ये ऋषभच्या गुडघ्याला मार लागल्याच स्पष्ट दिसतय. गुडघ्याला लागलेला मार पाहून ऋषभच्या करिअरबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत. ऋषभच्या गुडघ्याला फ्रॅक्चर नसल्याच उपचार करणाऱ्या डॉक्टरांच म्हणणं आहे. ऋषभ कधीच या दुखापतीमधून सावरणार नाही, अशी ही दुखापत नाहीय. तो या दुखापतीमधून बरा होऊ शकतो, असं डॉक्टरांच म्हणणं आहे. पुढील उपचार कुठे होणार?

ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात येतील. गरज पडल्यास, त्याला एक-दोन दिवसात दिल्लीच्या रुग्णालयात त्याला हलवण्यात येईल. दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनने ही माहिती दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.