Rishabh Pant Car Accident: ‘मी ऋषभ पंत आहे’….रक्तबंबाळ अवस्थेत क्रिकेटरला बस ड्रायव्हरला सांगावी लागली ओळख
Rishabh Pant Car Accident: अपघातानंतर सर्वप्रथम सुशील कुमार नावाचा बस ड्रायव्हर ऋषभ जवळ पोहोचला होता.
Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीवरुन रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारला आग लागली. सुदैवाने या अपघातातून ऋषभचे प्राण वाचले. पण ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभची कार रुडकीच्या गुरुकुल नारसन क्षेत्रात डिवायडरला धडकली. जखमी ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून बाहेर पडला.
ऋषभ जवळ पोहोचला बस ड्रायव्हर
या अपघातानंतर सर्वप्रथम सुशील कुमार नावाचा एक बस ड्रायव्हर ऋषभ जवळ पोहोचला होता. त्याने पंतला सावरलं. रुग्णवाहिका बोलून पंतला रुग्णालयात पाठवलं. ऋषभला मी पाहिलं, तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. मी क्रिकेटर ऋषभ पंत आहे, अशी ओळख त्याने सांगितली. ऋषभ स्वत:च्या कारने दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. त्यावेळी अपघात झाला. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. कारने पेट घेतला.
MRI स्कॅन झालं
ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. पंतसोबत त्याची आई रुग्णालयात आहे. पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला मार लागलाय. त्याच MRI स्कॅन करण्यात आलं. पायाला आणि पाठिला सुद्धा मार लागलाय.
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा पहाटे भीषण अपघात झाला. या अपघतात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.#Rishabpant #Rishabpantaccident #accident #IndianCricketer #TeamIndia pic.twitter.com/kwP57lghYD
— BhimRao Gawali (@BhimraoGawali) December 30, 2022
ड्रायव्हरने काय सांगितलं?
“मी हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिव्दारवरुन येत होतो. नारसनपासून 200 मीटर अंतरावर दिल्लीकडून येणारी कार डिवायडरला धडकली. या कारचा स्पीड 60 ते 70 किमी प्रतितास होता. धडकल्यानंतर कार हरिद्वार लाईनमध्ये आली. आमची बस सुद्धा धडकली असती. ऋषभच्या कारपासून मी 50 मीटर अंतरावर होतो. मी बस सर्विस लाइनमधून फर्स्ट लाइनवर आणली. माझ्या बसचा स्पीड 50 ते 60 होता. मी लगेच ब्रेक मारून खिडकीतून खाली उडी मारली” असं त्या ड्रायव्हरने सांगितलं. अंगावर चादर लपेटली
“मी पाहिलं ऋषभ पंत जमिनीवर पडलेला होता. कारमधून आगीचा स्पार्क येत होता. आम्ही त्याला उचलून बाजूला नेलं. कारच्या आत अजून कोणी आहे का? म्हणून विचारलं. मी एकटाच आहे, ऋषभ पंत असल्याच त्याने सांगितलं. मला क्रिकेटबद्दल इतकी माहिती नाही. मी त्याच्या बाजूला उभा राहिलो. शरीरावर कपडे नव्हते. आम्ही त्याच्या अंगावर चादर लपेटली. पोलिसांना फोन केला. रुग्णवाहिका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवलं” अशी माहिती बस ड्रायव्हर सुशीलने दिली.