रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीनही सीरिजमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावणाऱ्या रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी लागली आहे (Rishabh Pant is new captain of delhi capitals)

रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती
मुळचा उत्तराखंडचा असलेला रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो. पंतने गेल्या पर्वात 14 सामन्यांमध्ये 343 रन्स केल्या होत्या. पंतला या 14 व्या मोसमासाठी रिटेन केलं आहे. पंतसाठी दिल्ली टीम मॅनेजमेंटन 8 कोटी रुपये मोजले आहेत. पंत आयपीएलच्या 13 व्या मोसमानंतर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:00 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीनही सीरिजमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावणाऱ्या रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी लागली आहे. रिषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी करुन दाखवली. त्याच्या याच मेहनतीचं फळ आता त्याला मिळालं आहेत. रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिषभ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. रिषभच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तो आयपीएलमध्येही असाच फॉर्ममध्ये राहिला तर दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या ट्रॉफीसाठी दिल्ली दूर नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही (Rishabh Pant is new captain of delhi capitals).

संघाच्या प्रशिक्षकाकडून घोषणा

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या 9 एप्रिल पासून सुरु होणार आहे. या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी मोसमात रिषभ पंत आता दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

“रिषभ पंतमध्ये भरपूर क्षमता आहे. तो संघाचं नेतृत्व करु शकतो. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही रिषभवर संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं (Rishabh Pant is new captain of delhi capitals).

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त

इंग्लंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला एकदिवसीय सीरिजमधून बाहेर पडावं लागलं होतं. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर एक वेगवान बॉल रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खांदा दुखावला गेला. दुखापत गंभीर असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.