Rishabh Pant : ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा

ऋषभ पंत याची उत्तराखंड सरकारनं राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. युवकांना खेळ आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारन ही जबाबदारी पंत याच्यावर सोपवली आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा
ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 8:46 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याची उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने आपल्या राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केली आहे. तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवली आहे. गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) दिल्लीतील उत्तराखंड सदनात पंत याच्यासोबत फोनवर संवाद साधला. ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे वाढले आणि तेथेच त्यांचे शिक्षण झाले. तो दिल्लीतून रणजी खेळायचा. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः ट्विट करून पंत यांची राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘उत्तराखंडमधील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देवभूमीचे सुपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंत यांची राज्य सरकारने “राज्य ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास शुभेच्छा!’

ट्विट पाहा

ऋषभ पंतच्या कामिरीवर एक नजर टाकल्यास,

हायलाईट्स

  1. ऋषभ पंतनं 31 कसोटी, 27 वनडे आणि 54 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 2123, 840 आणि 883 धावा केल्या आहेत.
  2. या खेळाडूने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियाची कमानही सांभाळली आहे.
  3. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
  4. पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणे आश्चर्यकारक आहे. पंतने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करून हे नाव कमावले आहे. यामुळे आता त्याला मोठी जबाबरादीर मिळाल्यानं त्याचीही जबाबदार वाढली आहे. पंतच्या आधी त्याचा गुरू महेंद्रसिंग धोनीही या राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर राहिला आहे.

ऋषभ पंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्यान आतापर्यंत 31 कसोटी, 27 वनडे आणि 54 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 2123, 840 आणि 883 धावा केल्या आहेत. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऋषभ पंतची गाबा खेळी खूप लक्षात राहते. या खेळाडूने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियाची कमानही सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.