‘लोक फेमस होण्यासाठी खोटं बोलतात’, ऋषभ पंतचं उर्वशी रौतेलाला उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (rishabh pant) मध्ये आता एक नवीन वाद सुरु झाला आहे.

'लोक फेमस होण्यासाठी खोटं बोलतात', ऋषभ पंतचं उर्वशी रौतेलाला उत्तर
uravshi-rishabhImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 12:15 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (rishabh pant) मध्ये आता एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने नाव न घेताच ऋषभ पंत बद्दल एक मोठं विधान केलं होतं. तिचं म्हणणं होतं की, पंत तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या (Hotel) बाल्कनी मध्ये तिची वाट पाहत होता. आता ऋषभ पंतने सुद्धा नाव न घेताच उर्वशी रौतेलाला उत्तर दिलं आहे. अभिनेत्री आपलं नाव घेऊन लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करतेय, असं ऋषभ पंतने म्हटलं आहे.

पंतने इन्स्टाग्राम स्टोरी मध्ये काय म्हटलं होतं?

ऋषभ पंतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून उर्वशीच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “हसण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक मुलाखती मध्ये खोटं बोलतात. जेणेकरुन त्यांना लोकप्रियता मिळेल. ते हेडलाइन मध्ये येतील. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत. ही खूप खराब बाब आहे. देव त्यांना आनंदी ठेवो. माझा पाठलाग सोडं. खोटं बोलण्याची पण मर्यादा असते” इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यानंतर ऋषभ पंतने सात मिनिटानंतर ती स्टोरी डिलीट केली. सोशल मीडियावर या स्टोरीचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.

उर्वशीचा इंटरव्यू झाला व्हायरल

अलीकडेच उर्वशीने एक मुलाखत दिली. त्यात तिने दिल्लीच्या हॉटेल मधला किस्सा सांगितला. “तिथे आरपी नावाचा व्यक्ती तिची वाट पाहत थांबला होता. मी वाराणसीला शूटिंग करुन दिल्लीला आली होती. तिथे माझा शो होता. मी पूर्ण दिवस शूटिंग केलं होतं. 10 तासाच्या शूटिंग नंतर मी परत आले, तेव्हा थकले होते. मी येऊन झोपले. मिस्टर आरपी तिथे आला व लॉबी मध्ये बसून माझी वाट पाहत होता. त्याने जवळपास 17 फोन कॉल मला केले होते. त्यानंतर त्याला मी मुंबईत यायला सांगितलं”

उर्वशीने नाव नाही घेतलं

उर्वशीला जेव्हा विचारण्यात आलं, आरपी कोण आहे. तेव्हा तिने उत्तर द्यायला नकार दिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी अंदाज लावला की, उर्वशी ऋषभ पतं बद्दल बोलत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. पंतला हे आवडलं नाही. त्याने सुद्धा उर्वशीला उत्तर द्यायचा निर्णय घेतला. पंतच्या करीयरच्या सुरुवातीला अशी चर्चा होती की, तो उर्वशीला डेट करतोय. याला दुजोरा कधीच मिळाला नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.