Marathi News : IPLला मुकला, आता… ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी

यंदाच्यावर्षीच भारतात वनडे विश्वचषख सामना होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. मात्र, या विश्वचषकात स्टार खेळाडू ऋषभ पंत खेळणार नाही. कारण तो अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही.

Marathi News : IPLला मुकला, आता... ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी
Rishabh PantImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 2:11 PM

नवी दिल्ली : यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाने तयारी केली आहे. पण या वर्ल्ड कपमध्ये भारताचा एक स्टार खेळाडू खेळणार नाही. तो म्हणजे ऋषभ पंत. पंत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप आणि नंतर वनडे विश्वचषकातून बाहेर राहणार आहे. क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. पंत गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी दिल्ली- डेहराडून मार्गावर अपघातात जखमी झाला होता. या अपघातातून थोडक्यात बचावला होता. पण जखमी झाल्याने तो अजूनही फिट नसल्याने त्याला विश्वचषकाला मुकावे लागणार आहे.

अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळेच ऋषभ पंत आयपीएल खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील टेस्ट सीरिजही तो खेळला नव्हता. जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही तो खेळू शकणार नाहीये. त्याच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक घटना आहे. ऋषभ पंत याच्यावर वेगाने उपचार होऊन तो बरा जरी झाला तरी जानेवारीपर्यंत तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही.

हे सुद्धा वाचा

तरीही सात ते आठ महिने जाणार

म्हणजेच ऋषभ वनडे विश्च चषकामध्ये खेळणार नाही. रिपोर्टनुसार पंत वेगाने बरा होत आहे. मात्र, तरीही पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला सात ते आठ महिने लागणार आहेत. पंत यापेक्षा अधिक वेळही घेऊ शकतो, असं सांगितलं जातं. पंतचा ज्या पद्धतीने अपघात झाला त्यावरून तो दीर्घकाळासाठी टीम इंडियाच्या बाहेर राहील हे स्पष्ट होतं. मात्र, तरीही तो विश्व चषकापर्यंत पुनरागमन करेल असं वाटत होतं. मात्र, ही आशाही मावळली आहे. बीसीसीआयने पंतबाबत अजूनही अधिकृतरित्या काहीही भाष्य केलेलं नाही.

सर्जरी झाली

दरम्यान, पंतने हिंमत हारलेली नसल्याचं सांगितलं जात आहे. तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. अपघातात त्याच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर सर्जरीही करण्यात आली आहे. याच वर्षी जानेवारीत ही सर्जरी करण्यात आली होती. त्यातूनच तो आता सावरत आहे. बीबीसीसीआयने त्याला संपूर्ण मदत केली आहे. त्याला सर्व वैद्यकीय उपचार दिले जात आहे. सध्या बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू आहे. अपघातानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं होतं. मुंबईत त्याच्यावर उपचार सुरू होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.